शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मदत घेणाऱ्या एनजीओ, शैक्षणिक संस्था, रुग्णालये माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:48 IST

सरकारतर्फे भरीव आर्थिक मदत घेणा-या गैरसरकारी संस्थांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देणे बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : सरकारतर्फे भरीव आर्थिक मदत घेणा-या गैरसरकारी संस्थांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देणे बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारी मदत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घेतली असेल तरीही अशा संस्था माहिती अधिकार कायद्याप्रमाणे जनप्राधिकरण ठरतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे या संस्थांना स्वत: होऊन माहिती जाहीर करावी लागेल व जनमाहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी नेमावे लागतील. माहिती आयुक्त त्यांना असे करण्यास भाग पाडू शकतात.२०१३ मध्ये डी.ए.व्ही. कॉलेज ट्रस्ट व इतरांनी डायरेक्टर आॅफ पब्लिक ट्रस्ट विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत डी.ए.व्ही. कॉलेज ट्रस्ट व इतर शैक्षणिक संस्था या खाजगी संस्था आहेत. त्यामुळे त्या माहिती अधिकार कक्षेच्या बाहेर असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. खाजगी संस्थांना जनप्राधिकरण घोषित करणारे आदेश शासनाने दिलेले नाहीत, असेही त्यांचे म्हणणे होते.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक गुप्ता व अनिरुद्ध बोस यांनी हे म्हणणे अमान्य केले.माहिती अधिकार कायद्याचा उद्देश सार्वजनिक व शासकीय संस्थांमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे. जर खाजगी अशासकीय संस्था भरीव सरकारी मदत घेत असतील, तर नागरिक या संस्थेची माहिती का मागू शकत नाहीत, असा मुद्दा मांडला. आपण दिलेल्या पैशाचा या एनजीओ किंवा संस्था योग्य वापर करतात की नाही, याची माहिती मिळणे नागरिकांचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.>एनजीओम्हणजे काय?एनजीओची कोणत्याही कायद्यात व्याख्या नाही. एनजीओ म्हणजे अशा संस्था ज्या कायद्याप्रमाणे स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, याचे स्वरूप सरकारी नाही.थोडी किंवा पूर्ण सरकारी मदत घेऊन चालणाºया संस्थाही सरकारी लोकांचा यात सहभाग न ठेवता आपले एनजीओचे स्वरूप कायम ठेवतात; पण जर त्यांना भरीव सरकारी मदत मिळत असेल, तर त्या संस्थांना माहिती अधिकार कायदा लागू आहेच.>यापूर्वी माहिती आयुक्त आणि उच्च न्यायालयांनी अशाच प्रकारचे निर्णय एनजीओच्या बाबतीत दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता तरी सरकारी मदत घेणाºया संस्था माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्वत: होऊन माहिती जाहीर करण्याचे व जनमाहिती अधिकारी नेमण्याचे वैधानिक कर्तव्य पार पाडतील, अशी अपेक्षा आहे.- शैलेश गांधी, माजी केंद्रीय माहिती आयुक्त

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता