शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

बळेगाव सोसायटीवर गोरठेकर गटाचे वर्चस्व सर्व १२ उमेदवार विजयी, आ़वसंतराव चव्हाण गटाचा दारूण पराभव, गणेशराव गाढे यांच्या नेतृत्वाखाली सलग पाचव्यांदा दणदणीत विजय

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

उमरी : बळेगाव ग्रामपंचायतीपाठोपाठ झालेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत माजी आ़बापूसाहेब देशमुख गोरठेकर गटाचे सर्व १२ उमेदवार विजयी झाले असून सेवा सहकारी संस्थेवर गोरठेकर गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले़

उमरी : बळेगाव ग्रामपंचायतीपाठोपाठ झालेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत माजी आ़बापूसाहेब देशमुख गोरठेकर गटाचे सर्व १२ उमेदवार विजयी झाले असून सेवा सहकारी संस्थेवर गोरठेकर गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले़
या निवडणुकीत विद्यमान आ़वसंतराव चव्हाण गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले़ माजी आग़ोरठेकरांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा प्रवक्ता गणेशराव गाढे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली़ या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- गणेशराव गाढे, संभाजी गाढे, पांडुरंग गाढे, सय्यद रहेमतुल्ला शादुल्ला, प्रकाश गाढे, दिगंाबर गाढे, किशन गाढे, पार्वतीबाई वंगरवार, हणमंत पिंपळे, अन्नपूर्णाबाई गणपती कटके, अशरफबी महमद, नागोराव दशरथ जिंजोरे़
स्थापनेपासून बळेगावची सेवा सहकारी संस्था ही गोरठेकर गटाच्या ताब्यात असून गणेशराव गाढे यांच्या नेतृत्वाखाली ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक आहे़ तळेगाव ग्रामपंचायत, गोळेगाव, इज्जतगाव, बळेगाव, सिंधी, गोरठा येथील विजयानंतर बळेगाव सेवा सहकारी संस्थेवर गोरठेकर गटाने विजयी झेंडा फडकाविला आहे़

पाणीप्रश्न वेशीवर टाकल्याने मध्यस्थीतांकडून दबावतंत्राचा प्रयोग
गडगा : टँकरच्या अनियमित फेर्‍यामुळे गडगा ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे प्रचंड हाल, प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचार्‍यांची बेताल प्रतिक्रिया, अन् टँकरसोबत राहणार्‍या मध्यस्थीतांमुळे पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटण्याचे संकेत या अनुषंगाने पाणीटँकर वाटपाच्या समस्येचा पंचनामा लोकमतने २४ एप्रिलच्या अंकात सविस्तरपणे मांडल्यानंतर मध्यस्थीच्या भूमिकेत लुडबूड करण्याचे पित्त खवळले असून या मंडळीने लोकमतपुढे समस्या मांडलेल्या ग्रामस्थांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरू केले आहे़ दरम्यान, या दबावतंत्राच्या पाठीमागे एक कर्मचारी (तालुकास्तरावरील) पडद्यामागून सूत्र चालवित असल्याची माहिती समोर येत आहे़
गडगाग गावची नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्याने प्रशासनाने गावास टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे़ २४ हजार लिटरचे एक टँकर, सहा पॉईंट, दिवसातून तीन फेर्‍या असे कागदावरचे नियोजन आहे़ पण प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून विविध कारणांचा पाढा ग्रामस्थांना सांगीत टँकरफेरीत चुकवेगिरीचा प्रकार चालू आहे़
टँकर चुकवेगिरीतून कुणाला लाभ मिळतो यावर प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी संशोधन करण्याचा विषय आहे़ सध्या भीषण दुष्काळीस्थितीने पाण्याचे स्त्रोत आटले़ टँकर आले तर ठीक नाहीतर पाण्याविना हाल होत आहेत़ अशातच गडगा ग्रा़पं़चा कारभार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा झाला आहे़ पदसिद्धऐवजी चिरंजीव, पतीराज ही मंडळी कारभाराची सूत्र हाती घेतल्याने आरक्षण योजनेस हारताळ फासला जात आहे़ ग्रामसभेत समिती गठीत करणे अनिवार्य व अपेक्षित असताना काहींनी स्वत:ला स्वयंसिद्ध समिती अध्यक्ष जाहीर करून टाकले आहे़ एकंदरीत हे काहीही अस९ा पण आम्हाला पाणी मिळाले पाहिजे एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे़