शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! UPSC नापास उमेदवारांनाही नोकरी मिळणार, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 17:40 IST

यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे

नवी दिल्ली - देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढीस लागली आहे. त्यामुळे अवघ्या एका गुणांमुळे विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं पाहायला मिळते. अगोदर पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत देऊन यूपीएससीमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमावतात. मात्र, अनेकदा मुलाखतीत निवड न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागते. पण, आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे. ओडिशामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या संमेलनात बोलताना युपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी सांगितले. यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांनी भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे, जे नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखत फेरीमध्ये बाद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ तरी त्यांना मिळेल, असे आयोगाला वाटते. 

एका वर्षात जवळपास 11 लाख उमेदवार विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेला बसतात. मात्र, केवळ 600 ते 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या 11 लाख विद्यार्थ्यांपैकी कित्येकजण जोमाने तयारी करतात, पूर्व परीक्षा पास होतात, मुख्य परीक्षाही पास होतात. मात्र, मुलाखतीनंतर काही गुणांमुळे मेरीटमध्ये मागे पडतात. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरलं जातं. कारण, या उमेदवारांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागते, पुन्हा पूर्व परीक्षेपासून या स्पर्धेत उतरावे लागते. त्यामुळे मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या, मेरीटमध्ये काही गुणांनी आपली रँक हुकलेल्या या उमेदवारांना इतरत्र सरकारी खात्यात नोकरी देण्यात यावी, अशी शिफारस आयोगाने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा तणाव कमी होऊन, नोकरीच्या आशा अधिक जिवंत होतील, असेही सक्सेना यांनी म्हटले. दरम्यान, यूपीएससी परीक्षा सहज आणि सोपी करण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. तर, परीक्षा ऑनलाईन करण्याबाबतही आयोगाचा विचार सुरू आहे.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाMPSC examएमपीएससी परीक्षा