शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता घरातून थेट सीटपर्यंत पोहोचणार सामान; नवीन सेवा सुरू

By देवेश फडके | Published: January 28, 2021 6:00 PM

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देरेल्वेकडून प्रवाशांसाठी नवीन सेवाआता घरातून थेट सीटपर्यंत पोहोचणार सामानकोरोना काळात घेणार विशेष काळजी

मुंबई :भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. आता प्रवासादरम्यानचे सामान घरातून थेट ट्रेनच्या रेल्वेच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेची ही सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय रेल्वे नेहमी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून प्रवाशांचे सामान रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा सामान उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वप्रथम ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्याचे ध्येय असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अॅपच्या माध्यमातूनही सेवेचा लाभ

विशेष बाब म्हणजे केवळ प्रवासामधील सामानच नाही तर एखादी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पार्सल म्हणून पाठवायची असल्यास ही सेवा वापरात येणार आहे.  या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

सामानाप्रमाणे शुल्क आकारणी

नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षण आणि सामानाची माहिती द्यावी लागणार आहे. प्रत्यक्ष ट्रेन निघण्यापूर्वी चार ते पाच तास आधी प्रवाशांच्या घरून सामान घेऊन थेट सीटपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनाप्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे. 

सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची काळजी

विमानतळांवरील सामानाप्रमाणे रेल्वेच्या सामानावरही बारकोड स्टीकर लावले जाणार आहेत. हे बारकोड स्कॅन करून प्रवाशांना सामान नेमके कुठे आहे, याची माहिती मोबाइलवर मिळणार आहे. कोरोना संकटामुळे सामानाचे सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेलाही आर्थिक फायदा होणार आहे, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेGujaratगुजरात