शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ration Card : गुड न्यूज! 'या' रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू, 14 किलो तांदळासोबत मोफत मिळणार तेल, मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:01 IST

Ration Card : सरकारने रेशनकार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनसोबतच तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे.

जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि तुम्हाला देखील मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण सरकारने रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनसोबतच तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केलं आहे. सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सामान्य रेशन कार्डधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे. सरकार देशभरातील रेशन कार्डधारकांना अनेक सुविधा देत असून ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. 

कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Prime Minister Garib Kalyan Yojana) लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.

तेल आणि मीठ मिळेल मोफत 

मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक असतील तर शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

लाखो कार्ड केली रद्द 

सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आतापर्यंत सरकारने सुमारे 10 लाख कार्डधारकांची कार्ड रद्द केली आहेत. रेशनकार्डच्या सुविधेचा लाभ अनेक अपात्र लोकही घेत आहेत, त्यामुळे सरकारने सर्व अपात्र लोकांची कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांचा डेटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"