शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

शेअर बाजारात दिसला चांगला दिवस (सुधारित)

By admin | Updated: May 18, 2014 00:14 IST

नवा उच्चांक : नाशिकमध्येही झाली कोट्यवधींची उलाढाल

 

नवा उच्चांक : नाशिकमध्येही झाली कोट्यवधींची उलाढालनाशिक : लोकसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच शेअर बाजारात सुरू झालेली चढउतार प्रत्यक्ष निकालानंतरही तशीच राहिली. बाजाराच्या अपेक्षेपेक्षाही स्थिर आणि एकाच पक्षाचे सरकार आल्याने शेअर बाजारात एकाच दिवसात मोठ्या रकमेची उलाढाल झाली. त्यात नाशिककरांनीही प्रॉफिट बुकिंग करून ऐतिहासिक उलाढालीत आपला सहभाग नोंदविला. शुक्रवारी बाजार उघडताच निर्देशांक वर होता. २४ हजार २७१ वर उघडलेला बाजार २५,३७५ या उच्चांकाला स्पर्श करून आला. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात सुरू असलेली हालचाल निवडणूक निकालांबाबत बरीच बोलकी ठरत होती. भाजपाप्रणीत सरकार येईल, अशी अपेक्षा असताना, भाजपालाच पूर्ण बहुमत मिळाल्याने अर्थकारणाविषयी ठोस निर्णय घेता येतील, या अपेक्षेने बाजारात अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. त्यामुळे बाजार उघडल्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने विक्रमी पातळी ओलांडली. या दिवसभरात निर्देशांकाने मोठी झेप घेत पुन्हा घसरण अनुभवली. त्यामुळे दिवसभरात २००० हून अधिक अंकांची चढउतार निर्देशांकात दिसून आली. या मोठ्या उलाढालीत खरेदी करणारे आणि विक्री करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे निर्देशांक वाढताच विक्रीचा माराही सुरू झाला आणि निर्देशांक कोसळला. तरीही बाजार बंद होताना निर्देशांक २०० अंकांनी वरच राहिला. आता काही दिवस निर्देशांक याच पातळीवर राहील आणि वर्षभरात निर्देशांक ३० हजाराला स्पर्श करेल, असा अंदाज बाजारातून व्यक्त होतो आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी दूर राहावेबाजारात सुरू असलेल्या या चढउतारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. दिवसभरात बाजाराने खूप चांगली कामगिरी केली आहे. खरेदीदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे एक तास वर असणारा बाजार सायंकाळपर्यंत खाली आला. तरीही स्थिर सरकार आणि भाजपा पूर्ण बहुमतात आल्यामुळे बाजारात वाताहत झाली नाही. बंद होतानाही बाजाराचा निर्देशांक २०० ने वरच राहिला. यानंतरही सरकारसमोर असणार्‍या परकीय निधीची कमतरता आणि जीडीपी ग्रोथ या दोन मुद्द्यांवर बाजारात निर्देशांक कार्य करेल. या दरम्यान सामान्य गुंतवणूकदारांनी बाजारापासून लांब राहिलेलेेच बरे. - वृषाल सौदागर (कंपनी सचिव)इतिहासात प्रथमच मोठी उलाढालबाजाराला स्थिर सरकार अपेक्षित होते त्यापेक्षा चांगले सरकार आले. एकट्या भाजपाचे सरकार आल्याने शेअर बाजाराच्या दृष्टीने चांगले वातावरण आहे. यानंतरही निर्देशांकात १००० अंकांचा फरक होऊ शकेल. त्यानंतर निर्देशांक ३० हजारांपर्यंत जाऊ शकेल. या प्रॉफिट बुकिंगमध्ये नाशिककरांनी चांगली संधी साधली. बाजारात अनेक दिवसांपासून कॉल-पुट पद्धतीने होणार्‍या उलाढालीत झालेली गुंतवणूक आज लिक्वीडेट झाली. त्यात ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. नाशिकमधूनही अनेकांनी ही संधी साधली. देशाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक निकालाच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली असेल.- सुरेश लोया (प्रमुख, मोतीलाल ओसवाल ग्रुप)