शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ हे तर प्रत्येकाच्या मानण्यावर असतात : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 05:14 IST

‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी अशी अपेक्षा करतो.

पणजी : ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.गुरुवारी ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीतर्फे आयोजित ‘लोकमत गोवन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात गडकरी यांची प्रकट मुलाखत झाली. वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. गडकरी म्हणाले, केंद्रात जेव्हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकारची राजवट होती, तेव्हा देशातील महागाईचा दर १८.८ टक्के होता, तर आता महागाईचा दर केवळ ४ टक्के आहे. कोणीही पंतप्रधान झाला म्हणून लगेच सगळ्या गोष्टी होणार नाहीत. ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर आणि समाधानावर असतात. पंतप्रधान कोणा खासदाराला बोलू देत नाहीत, हा महाराष्ट्रातील एका खासदाराने केलेला आरोप चुकीचा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आम्हा चौघा केंद्रीय मंत्र्यांना बसून सर्व मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. त्यानुसार मी, अरुण जेटली, सुषमा स्वराज व राजनाथ सिंग एकत्र बसलो. प्रत्येक मंत्र्याकडील खात्यांचे मूल्यांकन केले व अहवाल पंतप्रधानांना दिला. त्यानंतर कुणाला कोणते खाते द्यावे व कुणाकडून कोणते खाते काढून घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार शेवटी पंतप्रधानांचाच असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याबाबतचा निर्णय घेत नाही. संघाचा संबंध येत नाही, असे गडकरी म्हणाले. मला स्वत:ला जल या विषयात खूप रस आहे. मी गेली दहा-बारा वर्षे या विषयी काम करत आलो आहे. त्यामुळे जलस्रोत खाते माझ्याकडे आले, या विषयी आनंद आहे; पण मी ते खाते मागितले नव्हते. तुम्हाला जे काम व्हायला हवे असे वाटते व जे होणे अशक्य झाले आहे, असे काम माझ्याकडे सोपवा. मी ते करून दोन वर्षांत शक्य करून दाखवतो, एवढेच मी पंतप्रधानांना सांगितले होते. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी जलस्रोत खाते देऊन नद्यांच्या स्वच्छतेचेही काम सोपवले आहे. मी ते करून दाखवीन, असे गडकरी म्हणाले. गंगा नदी शुद्ध करण्याची आणि नद्या जोडणी प्रकल्प राबविण्याची संधी मला मिळाली आहे. त्या विषयी मला आनंद वाटतो, असे गडकरी यांनी नमूद केले.सर्वांनाच भाजप प्रवेश नाही!विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे मला वाटते; मात्र राहुल गांधी यांनाच पक्ष विसर्जित करावा, असे वाटत असावे. विविध पक्षांमधून येणाºया सर्वांनाच भाजपमध्ये घेतले जात नाही. फक्त १० टक्क्यांना घेतले आहे, अजून ९० टक्के प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, अशी मार्मिक टिप्पणी गडकरी यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी