शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:38 IST

Indian Oil Corporation Limited Recruitment: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. पाईपलाईन डिव्हिजनअंतर्गत देशभरात रिक्त पदे आहेत. इ

नवी दिल्ली - इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. पाईपलाईन डिव्हिजनअंतर्गत देशभरात रिक्त पदे आहेत. इच्छुक उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईटवर १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत  plapps.indianoil.in या संकेतस्थळावर पाठवू शकता. आयओसीएल व्हेकन्सी २०२२ वर पात्रता, वेतन आणि इतर अधिक सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

वयोमर्यादेचा विचार केल्यास या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय किमान १८ वर्षे असलं पाहिजे. तर कमाल वयोमर्यादा ही २६ वर्षे एवढी निर्धारित करण्यात आली आहे. पगाराचा विचार केल्यास इंजिनियर असिस्टंटच्या पदासाठी २५ हजार ते १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत महिना पगार मिळेल. तर टेक्निकल अटेंडंट पदांवर नियुक्ती झालेल्यांना २३ हजार रुपयांपासून ७८ हजार रुपये महिना पगार मिळेल.  

उमेदवारी अर्ज करण्यासाठीच्या शुल्काचा विचार केल्यास जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये एवढे शुल्क आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी वर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रियेचा विचार केल्यास उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि स्कील, प्रोफिशिएन्सी आणि फिजिकल टेस्टच्या आधारावर केलं जाईल. जे इच्छुक उमेदवार या पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील. त्यांनी https://plapps.indianoil.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

इंजिनियरिंग असिस्टंट पदासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा फुट टाइम डिप्लोमा केलेला असावा.  

इंजिनियरिग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ग्रेड-IV पदासाठी इच्छुक उमेदवारा कुठल्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन