नवी दिल्ली : बुधवारी सराफा बाजारात सलग ५ व्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. सोने ३२0 रुपयांनी वाढून २८,५00 रुपये तोळा झाले. सोन्याचा हा ५ महिन्यांचा उच्चांक ठरला. चांदीचा भाव ४ महिन्यांच्या खंडानंतर ४0 हजार रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. लग्नसराईच्या खरेदीला वेग येत असल्यामुळे सराफा बाजारात तेजी परतली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. चांदीचा भाव ९५0 रुपयांनी वाढून ४0,१५0 रुपये किलो झाला. औद्योगिक क्षेत्राकडून, तसेच नाणे निर्मात्यांकडून मागणी आल्यामुळे चांदी तेजीत आली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, लग्नसराईप्रमाणेच जागतिक बाजारातील तेजीचा लाभही बाजाराला झाला. जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रतिऔंस १,३0३ डॉलरच्या वर गेले आहेत. सिंगापूर येथे सोन्याचा भाव 0.६ टक्के वाढून प्रतिऔंस १,३0३.६३ डॉलर झाला. चांदीचा भाव १.९ टक्के वाढून प्रतिऔंस १८.३३ डॉलर झाला. सप्टेंबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे.तयार चांदीचा भाव ९५0 रुपयांनी वाढून ४0,१५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,0३५ रुपयांनी वाढून ४0,२१५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ६४,000 रुपये आणि विक्रीसाठी ६५,000 रुपये प्रति शेकडा असा कायम राहिला. ४राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ३२0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,५00 रु. आणि २८,३00 रुपये तोळा झाला.४गेल्या वर्षी २0 आॅगस्ट रोजी सोने या पातळीवर होते. गेल्या सलग ५ सत्रांत सोन्याचा भाव १,१८0 रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव मात्र २४,000 रुपयांवर स्थिर राहिला.
सोन्याने केला पाच महिन्यांचा उच्चांक
By admin | Updated: January 21, 2015 23:50 IST