शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या खाणींचा भाग आमचाच; चीनचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:36 IST

अरुणाचल प्रदेशाजवळ हालचाली, भारत अस्वस्थ

बीजिंग : अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेटमधील ल्हुन्झे येथे भूगर्भातील सोन्याचे साठे बाहेर काढण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू केले आहे. तिबेट हा आमचा भाग असल्याने आम्ही करीत असलेली कृती वैध आहे असा दावा चीनने केला आहे. मात्र या हालचालींमुळे भारत अस्वस्थ आहे.ल्हुन्झे येथील भूगर्भात सोन्याबरोबरच, चांदी व अनेक खनिजांचे साठे आहेत. त्यांची एकूण किंमत ६० अब्ज डॉलर होईल. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले की, तिबेट हा चीनचा भूभाग असून तिथे काय करायचे ते आम्ही ठरवू. ल्हुन्झे येथे सुरु असलेले खाणकाम योग्यच आहे. चीन आपल्या प्रदेशाचे नेहमीच भूगर्भीय सर्वेक्षण करत असतो. त्यातूनच तिबेटमधील खनिजांच्या साठ्यांचा शोध लागला असून, तिथे आता खाणकाम सुरू आहे.चीन व भारतादरम्यान आजवर झालेल्या करारांचे भारताने नीट पालन केले पाहिजे, असा अनाहूत सल्ला देऊन ते म्हणाले की, भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संकेतही पाळायला हवेत. एखाद्या गोष्टीचा विनाकारण बागुलबुवा करु नये. (वृत्तसंस्था)अरुणाचलवर कायमच दावाअरुणाचल प्रदेश हा भारतीय प्रदेश असला तरी तो प्रदेश तिबेटचाच म्हणजे पर्यायाने चीनचाच भाग आहे, असा कांगावा त्या देशातर्फे करण्यात येतो. चीनची भूमिका कायमच विस्तारवादी राहिली असून त्याचे प्रत्यंतर डोकलाम वादाच्या वेळीही आले होते. भारताला लागून असलेल्या सीमाभागामध्ये चीन मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करीत आहे. त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश