नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबुती आणि स्थानिक बाजारपेठेत सणासुदीची खरेदी यामुळे बळ मिळालेल्या सोन्या-चांदीचे भाव सोमवारी वाढले. राजधानी दिल्लीत सोने 200 रुपयांनी वाढून 27,600 रुपये तोळा झाले आहे, तर चांदी 450 रुपयांनी वाढून 39,250 रुपये किलो झाली आहे.
बाजारपेठेतील सूत्रंनी सांगितले की, चांदीचे शिक्के बनविणा:यांनी तसेच औद्योगिक क्षेत्रने खरेदी वाढविल्याने चांदीचा भाव वाढला. दुसरीकडे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून सोन्याची मोठी खरेदी सुरू आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
याशिवाय जागतिक बाजारपेठेतही मजबुतीचा कल दिसून आला. सोने जवळपास चार आठवडय़ांच्या उच्चंकावर पोहोचले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर वाढविले जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे डॉलर कमजोर झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. सिंगापूरच्या बाजारात सोने 1.2 टक्क्यांनी वाढून 1,237.86 डॉलर प्रतिऔंस झाले. 17 सप्टेंबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. चांदी 0.8 टक्क्यांनी वाढून 17.54 डॉलर प्रतिऔंस झाली आहे.
तयार चांदीचा भाव 450 रुपयांनी वाढून 39,250 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 685 रुपयांनी वाढून 38,935 रुपये झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव आदल्या सत्रच्या पातळीवर म्हणजेच खरेदीसाठी 68 हजार रुपये आणि विक्रीसाठी 69 हजार रुपये प्रतिशेकडा असा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धता आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून अनुक्रमे 27,600 रुपये आणि 27,400 रुपये तोळा झाला. 9 सप्टेंबर रोजी सोने या पातळीवर होते. सोन्याचा 8 ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र 24,200 रुपये असा आदल्या सत्रच्या पातळीवर राहिला.