शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:41 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दहा दिवस कार्यक्रम

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत एक तर विरोधकांचा गैरसमज झाला आहे किंवा ते जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रचार करत आहेत, ते राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत इंडियन मर्चंट चेंबर्स येथे शुक्रवारी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. कारण या कायद्यामुळे शरणार्थींना चांगले दिवस येतील. हा कायदा अचानक आणलेला नाही. भाजपने याबाबत आपल्या घोषणापत्रात आश्वासन दिले होते. भाजप सरकार जनहिताची अनेक कामे करत आहे. विरोधक सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. तो दूर करण्यासाठी भाजप मुंबईत १० दिवस जनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविणार असून, या अंतर्गत तीन कोटी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या कायद्यामुळे विदेशात त्रास सहन करणाऱ्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वाची संधी मिळणार आहे. यावेळी मुंबई भाजपचे महामंत्री सुमंत घैसास, उपाध्याय हितेश आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद चिंतन उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकpiyush goyalपीयुष गोयल