संघ मुखपत्रतील लेख : संघ नेत्यांनी हात झटकले
नवी दिल्ली/थिरुवनंथपूरम : ‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता. त्यामुळे नथुराम गोडसे याने गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या घातल्या असत्या तर या देशाचे भले झाले असते,’ असा वादग्रस्त मजकूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मल्याळी मुखपत्र ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पं. जवाहरलाल नेहरू यांचा असा अनादर करणा:या या लेखावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. याबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द रा.स्व. संघानेही हात झटकत 17 ऑक्टोबर 2क्14 रोजी केरळमध्ये प्रकाशित झालेल्या या वादग्रस्त लेखाचा निषेध केला आहे. या लेखात प्रकाशित झालेली मते पूर्णत: लेखकाची व्यक्तिगत मते आहेत आणि त्या मतांशी आरएसएसला काही देणोघेणो नाही, असे आरएसएसचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एका आंदोलनाच्या रूपाने संघाने नेहमीच हिंसक विचार व कृतीची निंदा केली आहे असे सांगून वैद्य यांनी, संघ अशा विचारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कॉँग्रेसची संघ परिवारावर टीका
4या लेखात पुढे, नेहरू एक स्वार्थी नेते असल्याचा तसेच त्यांनी देशाच्या फाळणीबाबतचे सत्य गांधीजींपासून दडविले असाही उल्लेख आहे. या लेखावर जोरदार आक्षेप घेत केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांनी, संघ परिवाराचा हा इतिहासाची मोडमोड करून नेहरूंना अपमानित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
4नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपाचे उमेदवार राहिलेले भाजपाच्या राज्य समितीचे सदस्य बी. गोपालकृष्णन यांनी हा लेख लिहिला आहे.भाजपाच्या नेत्याने संघाच्या मुखपत्रत लिहिलेल्या या लेखामुळे संघ आणि भाजपा कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होते. भाजपाची विचारसरणी पूर्णत: हिंसाचार आणि द्वेषावर आधारित आहे. समाजाची याच आधारावर विभागणी करणो हा संघाचा हेतू आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग म्हणाले. दरम्यान ‘केसरी’च्या संपादकांनी या लेखाचे समर्थन करताना काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.