शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

देवाच्या दारातच थाटला संसार अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल : कचरा, खत कारखान्याजवळून हाकलून लावले मनपाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 18:15 IST

जळगाव: दूध फेडरेशनसमोरील झोपडप˜ीचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था न झाल्याने सखुबाई सुखदेव दुसींग (वय ९०) या वृध्देने देवाच्या दारात सामान ठेवून संसार थाटला आहे तर काही जणांनी रस्त्याच्या कडेलाच थांबून रात्र काढली. दरम्यान, शिवाजी नगराला लागूनच असलेल्या कचरा व खत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत बहुतांश जणांनी संसार हलविला, मात्र तेथूनही मनपाच्या कर्मचार्‍यांनी हाकलून लावले. त्यामुळे या अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत.

जळगाव: दूध फेडरेशनसमोरील झोपडप˜ीचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था न झाल्याने सखुबाई सुखदेव दुसींग (वय ९०) या वृध्देने देवाच्या दारात सामान ठेवून संसार थाटला आहे तर काही जणांनी रस्त्याच्या कडेलाच थांबून रात्र काढली. दरम्यान, शिवाजी नगराला लागूनच असलेल्या कचरा व खत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत बहुतांश जणांनी संसार हलविला, मात्र तेथूनही मनपाच्या कर्मचार्‍यांनी हाकलून लावले. त्यामुळे या अतिक्रमणग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत.
रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारी ३५० झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आले. या अतिक्रमणधारकांना प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी नोटीस देऊन पूर्वकल्पना दिली होती, त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. बेघर झालेल्या यातील बहुतांश कुटुंबाची पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्यांचा सामान अजूनही रस्त्याच्याच कडेला आहे. बायका व लहान मुला-बाळांसह रात्र त्याच जागेवर काढण्यात आली तर शनिवारी आडोश्याला पत्रे लावून वर साडी व अन्य कापड टाकून उन्हापासून बचाव करण्यात येत होता.
अनेकांनी भागवली पोटाची भूक
विस्थापित झालेल्या या कुटूंबाचा संसार उघड्यावर आल्याने गेंदालाल मील भागातील काही तरुण व त्याच परिसरातील साईबाबा मंदिराची सेवा करणार्‍या तरुणांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाना रात्री खिचडीचे जेवण पिण्यासाठी पाणी पुरविले. तर सकाळी चहाची व्यवस्था केली. शनिवारी मात्र एकाचीही चूल पेटली नाही. लहान मुलांसाठी बाहेरुन जे मिळेल ते खायला आणण्यात आले.
सरकारी बांधकाम तोडले
दुसर्‍या दिवशी शनिवारीही उर्वरित अतिक्रमण काढण्यात आले. रेल्वे प्रशासनाचेही बांधकाम शनिवारी जेसीबीद्वारे तोडण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा बलाचा तगडा बंदोबस्त दुसर्‍या दिवशी कायम ठेवण्यात आला. जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त मात्र काढून घेण्यात आला होता. बंदोबस्तावर असलेल्या या कर्मचार्‍यांनाही जागेवरच नाश्ता व जेवण पुरविण्यात आले.
दशक्रिया विधी झालाच नाही
या परिसरात राहणारे मधुकर बनसोडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. शनिवारी त्यांचा दशक्रिया विधी होता, मात्र अतिक्रमणात घरे जमीनदोस्त झाल्याने रहायलाच जागा नाही, तर विधी कसा करायचा म्हणून मोठा पेच बनसोडे परिवाराला पडला होता. शिवाय पाण्याचा व पाहुणे मंडळीचाही प्रश्न होताच, त्यामुळे नाईलाजाने हा विधीच रद्द करण्याची दुर्दैवी वेळ बनसोडे कुटुंबावर आली. दोन दिवस उशिराने अतिक्रमण काढले असते तर हा विधी होऊ शकला असता.