शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

#GoBackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये; सोशल मीडियावर निषेधाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:39 IST

सोशल मीडियावर मोदींचा जोरदार निषेध

चेन्नई: आजपासून चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांचा या एक्स्पोमध्ये सहभाग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. मात्र मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड होत आहे. सध्याच्या घडीला हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कावेरी पाणी वाटप प्रश्नात तामिळनाडूला मोठा धक्का बसला. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचं तामिळनाडूतील जनतेला वाटतं. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. या पार्श्वभूमीवर मोदी तामिळनाडूत येत आहेत. मोदींच्या या तामिळनाडू भेटीचा निषेध सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

'इथं येऊन खोटे अश्रू ढाळू नका. तामिळनाडूतील जनतेला मूर्ख बनवू नका. हे तामिळनाडू आहे, गुजरात नाही, हे लक्षात असू द्या,' अशा प्रकारच्या भावना अनेकांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी कावेरीचं पाणी पुरेशा प्रमाणात मिळालंच नाही, तर जगायचं कसं, असा सवाल मोदींना विचारला आहे. एका ट्विटर युजरनं तर मोदींना थेट चहा विकण्याचा सल्ला दिला आहे. 'तुम्ही पुन्हा एकदा चहा विकण्यास सुरुवात करा. त्यामुळे देशाचं भलं होईल,' असं ट्विट एका व्यक्तीनं केलंय. तर 'तामिळी जनता मोदींना राजकीय व्हिसा देणार नाही,' अशीही प्रतिक्रिया ट्विटरवर पाहायला मिळते आहे. 

 

 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडू