शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्या चोर अटकेत

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

बकऱ्या चोरणारी टोळी गजाआड

बकऱ्या चोरणारी टोळी गजाआड
दोघांना अटक : एक पसार, करभांड शिवारातून चार बकऱ्या जप्त
पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. एक पसार असून पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींकडून कारसह चार बकऱ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास पारशिवनी पोलिसांनी केली.
रूपेश नंदकिशोर पांडे (२१, रा. शांतीनगर कॉलनी, नागपूर) आणि राहुल कमल मालिकपुरी (२३, रा. पिवळी नदी, कामठी रोड, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर रूपेश पाली (३५, रा. जरीपटका, नागपूर) हा पसार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागातून बकऱ्या आणि मोटारपंप चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड, करंभाड, पालोरा, गुंढरी, इटगाव, तामसवाडी, डोरली, साहोली, सिंगोरी, पारडी येथूनही जनावरे चोरी गेली. अशाचप्रकारे नितीन सेवकराम फुले(३०, रा.करंभाड) याने २४ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील अंगणात एकूण २२ बकऱ्यासह लाकडी खुंट्याला तीन बोकड बांधलेले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बकऱ्या ओरडण्याचा आवाज आला. तसेच कुत्रे भुंकू लागले. त्यामुळे नितीनला जाग आल्याने तो घराबाहेर निघाला असता त्याला एमएच-३०/एल-६८११ क्रमांकाची व्हॅन दिसून आली. त्यात फिर्यादीच्या चार बकऱ्या कोंबल्याचे दिसले. त्याने आरडाओरड करताच आरोपींनी तेथून पळ काढला. याबाबत त्याने पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गस्तीदरम्यान व्हॅनसह बकऱ्या जप्त केल्या. तसेच आरोपींना अटक केली.
पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी सावनेर तालुक्यातील कोथुळणा-निमतलाई येथून बकऱ्या चोरून आणल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल टिकाराम जाधव, योगेश झोडापे, हरीश सोनभद्रे, संदीप नागरे, राजू रेवतकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)