शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:31 IST

Goa Health Minister: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य डॉक्टरवर केलेल्या कारवाईनंतर मोठा वाद झाला.

Goa Health Minister: गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH) मधील एका वरिष्ठ डॉक्टरशी झालेल्या वादानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. शनिवारी राणे यांनी GMCH च्या आपत्कालीन वॉर्डमध्ये अचानक तपासणी केली आणि रुग्णाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. रुद्रेश कुटीकर यांच्यावर जागेवरच तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. 

आरोग्यमंत्र्यांनी माफी मागितलीया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर राणेंवर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि विरोधी पक्षांकडून तीव्र टीका झाली. त्यानंतर विश्वजित राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, 'मी IMA आणि CMO यांची माफी मागू इच्छितो.' 

'राजकीय रंग देण्याचा हेतू नव्हता'त्यांनी असेही म्हटले की, 'या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मी फक्त एका रुग्णाच्या बाजूने उभा राहिलो. रुग्णाचे दुःख मला समजते, कारण माझी आई स्वतः कर्करोगाची रुग्ण आहे. माझा हेतू बरोबर होता, पण माझे शब्द चुकीचे होते,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून निलंबनाचे आदेश मागे

वाद वाढल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'मी झालेल्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी गोव्यातील लोकांना खात्री देऊ इच्छितो की डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केले जाणार नाही. राज्य सरकार आणि आमचे समर्पित वैद्यकीय पथक प्रत्येक नागरिकासाठी आरोग्यसेवेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. जीव वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे आणि अमूल्य सेवेचे आम्ही कौतुक करतो', अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण ?शनिवारी विश्वजित राणे यांना एका ज्येष्ठ पत्रकाराकडून तक्रार मिळाली की त्यांच्या सासू सायटिकाने ग्रस्त असून, त्यांना जीएमसीएचच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये इंजेक्शन नाकारण्यात आले. राणे यांनी या तक्रारीच्या आधारे तात्काळ कारवाई केली आणि डॉ. कुटीकर यांना अतिशय टोकाच्या शब्दात फटकारले आणि त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

 

टॅग्स :goaगोवाHealthआरोग्यministerमंत्रीdoctorडॉक्टर