शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खिचडी होणार ‘ग्लोबल ब्रँड’! केंद्र सरकारने घेतला पुढाकार, पाककृती जगभर लोकप्रिय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 06:46 IST

लहान-थोर आणि गरीब-श्रीमंत अशा सर्वांच्या आवडीच्या ‘दाल खिचडी’चा भारतीय खाद्यपदार्थांतील ‘ग्लोबल ब्रँड’ म्हणून सक्रियपणे प्रसार करण्याचे सरकारने ठरविले असून, येत्या शुक्रवारपासून दिल्लीत भरणाºया ‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ्यात भारतातर्फे ‘खिचडी’ हा अधिकृत प्रातिनिधिक पदार्थ म्हणून सादर केला जाणार आहे.

नवी दिल्ली : लहान-थोर आणि गरीब-श्रीमंत अशा सर्वांच्या आवडीच्या ‘दाल खिचडी’चा भारतीय खाद्यपदार्थांतील ‘ग्लोबल ब्रँड’ म्हणून सक्रियपणे प्रसार करण्याचे सरकारने ठरविले असून, येत्या शुक्रवारपासून दिल्लीत भरणा-या ‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ््यात भारतातर्फे ‘खिचडी’ हा अधिकृत प्रातिनिधिक पदार्थ म्हणून सादर केला जाणार आहे.या निमित्त प्रत्यक्ष खिचडी शिजविण्याचा जागतिक विक्रम करण्याचाही आयोजकांचा मानस आहे. या खाद्यमेळ््यात ख्यातनाम शेफ संजीव कपूर सात फूट व्यासाच्या आणि एक हजार लीटर क्षमतेच्या भव्य कढईत ८०० किलोहून अधिक खिचडी शिजवतील. खाद्यमेळ््यात ‘ग्रेट इंडिया फूड स्ट्रीट’वर ही खिचडी मुख्य आकर्षण असेल. संजीव कपूर भारतीय खाद्यसंस्कृतीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर’ म्हणून प्रतिनिधित्व करतील.‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ््याचे आयोजन भारत सरकारचे अन्नप्रक्रिया मंत्रालय व ‘कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज’ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. शुक्रवारपासून तीन दिवस तो चालेल.या खाद्यमेळ्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, या वेळी शिजविली जाणारी खिचडी ६० हजार अनाथ मुलांना व कार्यक्रमाला हजर असलेल्या पाहुण्यांना खायला दिली जाईल.भारतामधील परकीय वकिलातींच्या प्रमुखांनाही या खिचडीचे वाटप, पाककृतीच्या सचित्र पुस्तिकेसह केले जाईल. जगभरातील भारतीय वकिलाती त्या-त्या देशात खिचडी आणि तिची पाककृती सक्रियतेने लोकप्रिय करतील. याखेरीज जगभरातील उपाहारगृहे व खाद्यकेंद्रांमध्ये खिचडी उपलब्ध व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले.एक पोटभरीचा सकस आहार म्हणून देशाच्या कानाकोपºयास खिचडीचे समाजाच्या सर्व थरांमध्ये आवडीने सेवन केल जाते. एक प्रकारे खिचडी हे भारताच्या विविधतेतील एकतेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. म्हणूनच या खाद्यमेळ््यासाठी ‘ब्रँड इंडिया फूड’ म्हणून तिची निवड करण्यात आली आहे.- हरसिमरत कौर बादल, केंद्रीय अन्नप्रक्रियामंत्री

टॅग्स :foodअन्न