मालकीबाबत आणखी पुरावे द्या मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांचे आदेश; पुढील बैठक ५ रोजी
By admin | Updated: January 22, 2016 00:09 IST
जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय या दोघांनी जागा भाडेपट्याने दिली की मालकी हक्काने याबाबतचा पुरावा देणारे आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले.
मालकीबाबत आणखी पुरावे द्या मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांचे आदेश; पुढील बैठक ५ रोजी
जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय या दोघांनी जागा भाडेपट्याने दिली की मालकी हक्काने याबाबतचा पुरावा देणारे आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले. मनपाचे महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट व शास्त्री टॉवर मार्केट असलेली जागा शासनाची असल्याने यावरील मार्केटमधील गाळ्यांबाबत महसूल विभाग निर्णय घेईल, असा निर्णय शासनाने दिला आहे. मात्र मनपाने ही जागा महसूल विभागाने निरंतर वापरसाठी मनपाला दिलेली असून मनपाने कुठलाही शर्तभंग केलेला नाही. त्यामुळे ही जागा आता मनपाचीच असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात मनपातर्फे नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम तर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे साजिदखान पठाण हे उपस्थित होते. त्यांनी बाजू मांडून कागदपत्र व अहवाल सादर केले. सचिवांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन कागदपत्रांचे अवलोकन केले. मात्र उपलब्ध कागदपत्रांवरून या जागा मालकी हक्काने दिल्या आहेत की भाडेपट्याने याचा बोध होत नसल्याने पुराव्यासाठी दोन्ही बाजूंनी आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. ----- इन्फो----५ रोजी बैठकप्रधान सचिवांनी बैठकीत या विषयी माहिती घेतल्यानंतर आता पुराव्यासाठी आणखी कागदपत्र सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला असून पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.