शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:29 IST

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राहुल त्याची होणारी सासू अनिता देवी हिच्याशी फोनवर बोलत असला तरी, त्याने सासरा जितेंद्रच्या तब्येतीचीही अनेक वेळा विचारपूस केली होती. जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतल्यानंतर तो त्याच्या सासूशी बोलू लागला आणि तिच्याच सोबत पळून गेला.

जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."

"आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांसह राहुलच्या घरी गेलो होतो. राहुल आणि त्याच्या वडिलांशीही बोललो. सर्वांना राहुल आवडला. यानंतर राहुलचं लग्न ठरलं होतं. आम्हाला वाटत होतं की, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडेल. आम्ही मुलीची पाठवणी करू, राहुल तिला घेऊन जाईल, पण इथे उलट घडलं, तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला."

"राहुलच्या बहिणीचा नवरा रुद्रपूर येथे राहतो. तो मेहंदी काढण्याचं काम करतो. राहुल त्याच्याकडे गेला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. राहुलच्या बहिणीचा नवराही अनिताशी दोन-तीन वेळा फोनवर बोलला होता. अनिताचा नंबर त्याच्याकडे सेव्ह होता. राहुलने त्याच्याकडून अनिताचा नंबर घेतला आणि मग बोलू लागला." या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :marriageलग्न