शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विष पचविण्याची ताकद मला जन्मगावाने दिली, मोदींची वडनगरला भेट; आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:30 IST

गावक-यांच्या प्रेमाने आज मी भारावून गेलो आहे. या प्रेमाच्या जोरावर आता देशसेवेसाठी दुप्पट जोमाने झोकून देईन. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण भगवान शिवशंकराने आणि वडनगर या जन्मगावाने विष पचविण्याचीही ताकद मला दिली

वडनगर (मेहसाणा, गुजरात) : गावक-यांच्या प्रेमाने आज मी भारावून गेलो आहे. या प्रेमाच्या जोरावर आता देशसेवेसाठी दुप्पट जोमाने झोकून देईन. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण भगवान शिवशंकराने आणि वडनगर या जन्मगावाने विष पचविण्याचीही ताकद मला दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या आपल्या जन्मगावी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच भेट दिल्यानंतर ते बोलत होते.पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौ-यावर असून या ठिकाणी त्यांनी आज रोड शो केला. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच त्यांनी एका मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले. त्यानंतर एका सभेला ते संबोधित करत होते. ज्या ठिकाणी शिक्षण घेतले होते त्या शाळेला आज मोदी यांनी भेट दिली. बी.एन. हायस्कूल परिसरातील माती त्यांनी कपाळाला लावली. याच वडनगरमध्ये रेल्वे स्टेशनवर मोदी कधी काळी चहा विक्री करत होते. गुजरात ते दिल्ली या प्रवासातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गुजरातमध्ये ते १३ वर्षे मुख्यमंत्री होते.महादेव मंदिरात पूजा-मोदी म्हणाले की, भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने २००१ पासून मी देशसेवा करत आहे. या काळात अनेक लोकांनी माझ्यावर विष ओकले आहे. २००२ च्या गुजरात दंगलीनंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा बहुधा ते संदर्भ देत होते. वडनगरने मला विष पचविण्याची ताकद दिली, असे सांगून काशीप्रमाणेच आपले जन्मस्थान शिवभूमी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपानी हे हाटकेश्वर महादेव मंदिरातही गेले. तेथे त्यांनी पूजा अर्चना केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी