हैदराबाद : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची विनंती केली आहे़ शुक्रवारी आंध्र प्रदेश काँग्रेसने मीडियासाठी हे पत्र जारी केले़पंतप्रधानांना गुरुवारी लिहिलेल्या या पत्रात सोनियांनी आपल्याच एका जुन्या पत्राचाही हवाला दिला आहे़ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा, २०१३ लागू करण्यासंदर्भात २ जून २०१४ लिहिलेल्या माझ्या पत्राकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते, अशा शब्दांत सोनियांनी पत्राची सुरुवात केली आहे़ विभाजनानंतर आंध्र प्रदेशच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण व्हायला हवीत़ तथापि विभाजनाच्या आठ महिन्यानंतरही यासंदर्भात केंद्र सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नाहीत़ तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली होती़(लोकमत न्यूज नेटवर्क)
आंध्रला विशेष दर्जा द्या; सोनिया गांधीचे मोदींना पत्र
By admin | Updated: February 21, 2015 03:53 IST