शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 02:25 IST

अनुसूचित जातीच्या व अतिमागास घटकातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये व ११ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा विचार आहे.

चंदीगड : हरयाणामध्ये २१ आॅक्टोबर रोजी होणाºया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी आपला ‘संकल्पपत्र' हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सरकारी नोकºया व खासगी संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के राखीव जागा ठेवण्याचे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.या जाहिरनाम्यात म्हटले आहे की, हरयाणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात येतील. महिला कल्याणावर काँग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये भर देण्यात आला असल्याचे या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. हरयाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कुमारी सेलजा यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल. अनुसूचित जातीच्या व अतिमागास घटकातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये व ११ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा विचार आहे.भाजप सरकारच्या घोटाळ्यांची चौकशीकुमारी सेलजा म्हणाल्या की, हरयाणामध्ये भाजप सरकारच्या कारकिर्दीत जे घोटाळे झाले त्यांच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात येईल. राज्यातील अनेकांना अमली पदार्थांच्या व्यसनाने विळखा घातला आहे.या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा विचार आहे. या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते भूपिंदरसिंग हुडा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष किरण चौधरी, माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आदी ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक