शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन जबरदस्तीने केले धर्मांतर

By admin | Updated: August 4, 2014 14:07 IST

उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन टीम

मेरठ, दि. ४ - उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका शिक्षिकेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. बलात्कार करणा-या नराधमांनी जबरदस्तीने इस्लाम धर्मही स्वीकारायला लावला असे पिडीत शिक्षिकेचे म्हणणे असून या घटनेनंतर मेरठमध्ये तणाव निर्माण झाला होता. सध्या मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
मेरठमध्ये खरखौडा गावात राहणारी पिडीत शिक्षिका गावातील मदरसामध्ये हिंदी आणि इंग्रजी शिकवायची. सहा महिन्यांपूर्वी तिने मदरसामध्ये शिकवणे सोडून दिले व दुस-या शाळेत काम करु लागली. ईदच्या दुस-या दिवशी मदरसामधील मौलाना सनौल्लाह, सरपंच नवाब खान, त्यांची मुलगी सना उर्फ निसरत आणि अन्य काही जणांनी तिचे अपहरण केले.  अपहरणानंतर तिला हापूड येथेल मदरसामध्ये नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला व त्यानंतर जबरदस्तीने तिला धर्मांतर करायला लावले. यानंतर तिला मुजफ्फरनगरमधील एका मदरसामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तिला दररोज गुंगीचे इंजेक्शन दिले जात होते असे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. रविवारी पिडीत महिलेने अपहरणकर्त्यांची नजर चुकवून तिथून पळ काढून बस स्थानक गाठले व तिथून ती खरखौडात परतली. घरी परतल्यावर तिने कुटुंबियांना सर्व घटनाक्रम सांगितला व त्यानंतर तिच्या कुटुंबाने सनौल्लाह, नवाब आणि अन्य दोघा जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. वैद्यकीय चाचणीत महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती मेरठमध्ये वा-यासारखी पसरली व परिस्थिती तणावपूर्ण बनली. भाजप कार्यकर्त्यांनी मेरठ - हापूड मार्गावर रास्ता रोको केला. तर संतप्त जमावाने काही घरांवर हल्लाबोल केला. पोलिस महासंचालक ए.एल. बॅनर्जी म्हणाले, या घटनेनंतर मेरठ आणि सभोवतालच्या जिल्ह्यांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.