शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

गिरिजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिव

By admin | Updated: December 23, 2016 01:52 IST

प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन

चेन्नई : प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, राव यांच्या भवितव्यबाबत काहीही कळले नाही.मुख्य सचिवपदासोबत गिरिजा वैद्यनाथन दक्षता आयुक्त व प्रशासकीय सुधारणा आयुक्तपदाचाही अतिरिक्त पदभार सांभाळतील. गिरिजा वैद्यनाथन या १९८२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे १९९0 ते १९९३ या काळात गव्हर्नर असलेले एस. वेंकटीरमणन यांच्या त्या कन्या आहेत.प्राप्तिकर विभागाने पी. रामा मोहन राव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील घर आणि कार्यालयावर एकाचवेळी टाकलेल्या धाडीत ३० लाखांची रोकड (नवीन नोटांत) ५ किलो सोने आणि पाच कोटींची बेहिशेबी उत्पन्न आढळले. मात्र राम मोहन राव यांच्यावरील छाप्यांमुळे अण्णा द्रमुक आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने मात्र या निमित्ताने अण्णा द्रमुक आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. (वृत्तसंस्था)भाजपाचा कट - अण्णा द्रमुकराव यांच्या घरी आणि कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडींमागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप सत्तारूढ अण्णा द्रमुकने केला आहे. केंद्राच्या विविध योजना आणि विधेयकांना पाठिंबा द्यावा, यासाठी अण्णा द्रमुकवर दडपण आणण्याच्या हेतूने या धाडी टाकण्यात आल्या असाव्यात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. एका माजी मंत्र्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर असे सांगितले की, भाजपप्रणीत एनडीए सरकारचा मोठा डाव असावा.