शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

किनमन बटू आकाशगंगेतील राक्षसी तारा अवकाशातून रहस्यमयरित्या अचानक गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:06 IST

अवकाश संशोधक अचंबित : सुपरनोव्हा विस्फोटाविनाच ताऱ्याचे अतिविशाल कृष्ण विवर बनले असण्याची शक्यता; तेजस्विता कमी झाल्यामुळेही होऊ शकतो अदृश्य

नवी दिल्ली : किनमन बटू आकाशगंगेतील (किनमन डॉर्फ गॅलॅक्सी) एक राक्षसी तारा (मॅसिव्ह स्टार) अचानक गायब झाल्याने अवकाश संशोधक अचंबित झाले आहेत. अवकाश संशोधनास वाहिलेल्या ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनिमकल सोसायटी’ या नियतकालिकात यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हा तेजस्वी नील तारा असून, २00१ ते २0११ या काळात करण्यात आलेल्या अवकाश निरीक्षणातील गृहीतकांद्वारे त्याचे अस्तित्व मान्य करण्यात आले होते. २0१९ मधील निरीक्षणांत मात्र तो गायब असल्याचे आढळून आले.

डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजचे पीएच.डी.चे विद्यार्थी अँड्र्यू अ‍ॅलन यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने यासंबंधीचा शोधनिबंध लिहिला आहे. लेखात म्हटले आहे की, हा राक्षसी तारा गायब होण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, या ताºयाचे तेज लक्षणीयरीत्या कमी झाले असावे आणि त्यामुळे तो काही अवकाशस्थ धुळीच्या आड झाकला गेला असावा. दुसरी शक्यता म्हणजे, सुपरनोव्हा विस्फोट न होताच तो एका कृष्ण विवरात (ब्लॅक होल) रूपांतरित झाला असावा. दुसरी शक्यता खरी असल्यास असफल सुपरनोव्हाचे हे दुसरे ज्ञात उदाहरण ठरेल.

या अतिविशाल एलबीव्ही ताºयाचे फेरनिरीक्षण करण्यासाठी २0१९ मध्ये अवकाश शास्त्रज्ञांच्या एका पथकाने ‘युरोपियन साऊदर्न ऑब्झर्वेटरी’ची अतिविशाल दुर्बीण त्याच्याकडे रोखली. तथापि, त्या ताºयाच्या जागी त्यांना काहीच आढळले नाही. अ‍ॅलन यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील वेबसाईट ‘गिझमोडो’ला सांगितले की, ऑगस्ट २0१९ मध्ये आम्ही पहिले निरीक्षण केले. त्या ताऱ्यांचे अस्तित्व (सिग्नेचर) तेथे नसल्याचे पाहून आम्ही चकित झालो. त्यानंतर आम्ही अनेक वेळा निरीक्षणे केली. तथापि, प्रत्येक वेळी आम्हाला ताऱ्याचे अस्तित्व दिसलेच नाही. त्यानंतर आम्ही अतिविशाल दुर्बिणीच्या ‘एक्स शूटर’ उपकरणाचा वापर करून निरीक्षण केले. तरीही तारा गायबच होता.

ही अत्यंत रहस्यमय खगोलीय घटना असल्यामुळे ताºयाच्या आधीच्या वर्तणुकीचा अभ्यास करणे आवश्यक होते. त्यानुसार, आम्ही बटू आकाशगंगेची आधीची निरीक्षणे तपासली. त्यात असे आढळून आले की, हा रहस्यमय तारा त्याच्या विस्फोटाच्या कालखंडात होतो. २0११ च्या सुमारास त्याचा विस्फोट कालखंड संपला. विस्फोट काळात एलबीव्ही तारे प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकतात. त्यावेळी त्यांचे वस्तुमान अचानक कमी होऊन तेजस्विता वाढते. किनमन बटू आकाशगंगेत त्या तेजस्वी ताºयाच्या रूपाने आपण एका जिवंत ताºयाच्या आयुष्यातील शेवटचा उत्सर्जनाचा कालखंड पृथ्वीवरून पाहत होतो, असा निष्कर्ष यातून काढता येतो. हा तारा अजूनही तेथे असावा; पण त्याची तेजस्विता आता कमी झाली असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला पृथ्वीवरून जाणवत नसावे.

अ‍ॅलन यांनी सांगितले की, दुसºया शक्यतेनुसार, हा तारा सुपरनोव्हा विस्फोट न होताच विशाल कृष्ण विवरात रूपांतरित झाला असावा. यालाच शास्त्रज्ञ ‘असफल सुपरनोव्हा’ म्हणतात. काही तारे मरताना तेजस्वी सुपरनोव्हा उत्पादित करीत नाहीत, असे सध्या उपलब्ध असलेल्या काही संगणकीय प्रतिमानांतही अनुमानित करण्यात आलेले आहे. जेव्हा फार गतिशील नसलेले अतिविशाल कृष्णविवर तयार होते, तेव्हा अशी घटना घडते. सुपरनोव्हा उत्पादित न होताच तारा कोसळून कृष्ण विवर तयार होण्याची एकच घटना याआधी शास्त्रज्ञांनी नोंदवलेली आहे. आकाशगंगा ‘एनजीसी ६९४६’ मध्ये एक छोटा तारा सुपरनोव्हा विस्फोटाविनाच अदृश्य झाला होता.

अ‍ॅलन यांनी आपल्या शोधनिबंधात लिहिले की, किनमन बटू आकाशगंगेतील हा अतिविशाल तारा विस्फोटाविनाच कृष्ण विवरात रूपांतरित झाला असेल, तर ही बाब अवकाश संशोधन क्षेत्राला कलाटणी देणारी ठरेल. मोठ्या ताऱ्यांच्या बाबतीतील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.अंतिम निष्कर्षासाठी दीर्घ निरीक्षण हवेस्पेनमधील संस्था ‘आयएसी टेनेरिफ’ आणि स्वीडनची ‘नॉर्डिक इन्स्टिट्यूट फॉर थिअरॉटिकल फिजिक्स’ येथील पोस्टडॉक्टरेट संशोधक बिट्रिझ विल्लारोएल यांनी सांगितले की, अवकाशातून अदृश्य झालेल्या गोलांचे कित्येक दशके निरीक्षण करूनच अंतिम निष्कर्ष काढले जायला हवेत. या ताºयाबद्दलच्या शोधनिबंधातील निरीक्षण कालावधी खूपच अल्प आहे. भविष्यात या ताºयाच्या हालचाली आपणास पुन्हा दिसू शकतील, असे मला वाटते.किनमन बटू आकाशगंगा पृथ्वीपासून ७५ दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे. इतक्या दीर्घ अंतरावरील तारे अवकाश शास्त्रज्ञ पाहू शकत नाहीत.हा तारा ‘तेजस्वी नील परिवर्तनशील’ (एलबीव्ही) प्रकारातील असल्यामुळे त्याचा माग शास्त्रज्ञांना घेता आला.एलबीव्ही तारे अतिविशाल आणि अस्थिर असतात, तसेच ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असतात. या टप्प्यात ते इतके तेजस्वी बनतात की, पृथ्वीवरूनही त्यांना निरखता येते.किनमन बटू आकाशगंगेतील हा एलबीव्ही तारा आपल्या सूर्यापेक्षा २.५ दशलक्ष पट अधिक तेजस्वी आहे. यावरून त्याच्या तेजस्वितेची कल्पना यावी. किनमन बटू आकाशगंगेला ‘पीएचएल २९३बी’ या नावानेही ओळखले जाते....तर ताºयांबाबतचे सारेच आकलन बदलावे लागेल१) फ्लोरिडा विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ इम्रे बार्टोस यांनी सांगितले की, राक्षसी ताºयांबाबत आपल्याला अजून खूप गोष्टी जाणून घेणे बाकी आहे. एक तर असे तारे अत्यंत दुर्मिळ असतात आणि त्यांचा जीवनकाळही फारच थोडा असतो.२) या संशोधनात सहभागी नसलेल्या बार्टोस यांनी म्हटले की, सूर्यापेक्षा ६५ पट अधिक वस्तुमान असलेले तारे आपले जीवनमान संपविताना कृष्ण विवरात रूपांतरित होत नाहीत, यावर सध्या अवकाश संशोधकांचे एकमत आहे.३) हा तारा खरोखरच कोसळून कृष्ण विवर बनला असेल, तर आपल्याला ताºयांचे जीवन आणि मृत्यू याबाबतचे आकलन बदलावे लागेल.४) बार्टोस यांनी म्हटले की, याक्षणी तरी या संशोधनाबाबत साशंकता आहे. ही निरीक्षणे पुढेही सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :scienceविज्ञान