शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नववधूच्या डोक्यावरचा पदर उचलताच सासरच्या मंडळींना बसला धक्का, नवरदेवाचा तर थेट आत्महत्येचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:38 IST

'मुंह दिखाई'चा विधी पार पडला तेव्हा वधूच्या डोक्यावरील पदर उचलताच सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमिनच सरकली.

सम्बळ-

उत्तर प्रदेशच्या सम्बळ जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. वधू पक्षानं आपल्या धाकट्या बहिणी ऐवजी थोरल्या बहिणीला लग्नाला डोक्यावर पदर घेऊन बसवलं असा आरोप वर पक्षाकडून करण्यात आला आहे. लग्न सोहळा झाला अन् सासरी जेव्हा 'मुंह दिखाई'चा विधी पार पडला तेव्हा वधूच्या डोक्यावरील पदर उचलताच सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमिनच सरकली. वर पक्षाच्या कुटुंबीयांनी संतापाच्याभरात वधूला थेट तिच्या घरी धाडलं. आता नवरदेवानं तर आपल्याला न्याय न मिळाल्यास थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

घटना हजरत नगर गढीच्या पोलीस ठाणे हद्दीतील कटौली गावातील आहे. गावातील एका मुलीचा विवाह सोहळा २६ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. घराण्यातील विधींनुसार वधूनं डोक्यावर पदर घेत चेहरा लपवला होता. सर्व विधींनुसार सात फेरे घेतेले आणि वर-वधूंनी साताजन्माची साथ देण्याचं वचन दिलं. 

लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरदेव वरातीसह आपल्या गावी परतला. सासरच्या घरी आल्यानंतर परंपरेनुसार 'मुंह दिखाई'चा विधी सुरू झाला. वर पक्षाकडील महिलांनी जेव्हा वधूच्या डोक्यावरील पदर वर केला तेव्हा उपस्थितांना मोठा धक्काच बसला. 

वधूच्या कुटुंबीयांनी त्यांच्या धाटक्या बहिणी ऐवजी थोरल्या बहिणीचं लग्न लावून दिल्याचं वर पक्षाला कळलं. खरंतर वर पक्षानं धाटक्या बहिणीला पसंत केलं होतं. तशी बोलणीही झाली होती. पण लग्नाच्या दिवशी वधू पक्षाकडून थोरल्या बहिणीला लग्नासाठी उभं करण्यात आलं. बघता बघता ही घटना संपूर्ण गावात पसरली आणि सासरच्या मंडळींनी नववधूला तिच्या माहेरी पाठवलं. दोन्ही पक्षाच्या वादामुळे मोठा गदारोळ उडाला होता. 

वधूची मानसिक स्थिती अस्थिर वधू पक्षाकडून या घटनेबाबत वर पक्षाकडून वारंवार हुंडा मागितला जात होता म्हणून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. तर वर पक्षानं वधू पक्षाकडून फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. वधू पक्षानं धाकटी बहिण दाखवून थोरल्या बहिणीसोबत लग्न लावून दिलं जिची मानसिक स्थिती ठिक नाही असा आरोप वर पक्षानं केला आहे. 

नवरदेवाची आत्महत्येची धमकी२६ जानेवारीपासून ते आजवर याप्रकरणी पंचायत होत राहिली. पण अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. आता नवरदेवानं न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिला आहे. वर पक्षानं आता पोलिसात धाव घेतली आहे आणि पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.