शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

एका SMSवर मिळवा पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर

By admin | Updated: June 13, 2017 11:25 IST

ग्राहकांना पेट्रोल आणि डिझलच्या रोजच्या दराविषयी माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था केली आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज ठरणार आहेत, या दरांमध्ये रोज बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझलच्या रोजच्या दराविषयी माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेमध्ये ग्राहकांनी मोबाईलवरून एक SMS केल्यास घरबसल्या त्यांना दरांची माहिती समजणार आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या निर्णयाला वितरकांनी विरोध केला होता. पण, तेल कंपन्या या निर्णयावर ठाम आहेत. यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार वितरकांना आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दुसऱ्या दिवशीचे दर कळविले जातीला. तर सामान्य ग्राहकांना मोबाईलवरून SMS पाठवून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती मिळवता येईल.  यासंबंधी हिंदूस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी आदेश जारी केले आहेत. 
काही दिवसांपूर्वीच देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 16  जूनपासून इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणार आहेत. याआधी पुदुच्चेरी, उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. या शहरांमधील प्रतिसादाच्या आधारे देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
असे जाणून घ्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरील दर
 
- तुम्ही www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
- Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर समजतील.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.
 
असे जाणून घ्या भारत पेट्रोलि‍यम’च्या पेट्रोल पंपावरील दर 
- www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती मिळेल.
- मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर किंमतीची माहिती मिळेल. 
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.