शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रदीर्घ प्रलंबित खटले लवकर निकाली काढा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 02:08 IST

न्यायालयांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढावेत, असे पत्र सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायाधीशांना केंद्र सरकार लिहिणार आहे

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : न्यायालयांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढावेत, असे पत्र सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायाधीशांना केंद्र सरकार लिहिणार आहे. ही माहिती केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी लोकसभेत दिली.ते म्हणाले की, न्यायदान करणे हे सरकारचे नव्हे, तर न्यायालयांचे काम आहे. खटले चालविण्यासाठीची यंत्रणा सरकार उपलब्ध करून देते. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरीत्या काम करतात. न्यायालयांमध्ये अनेक जागा रिकाम्या असून, आयएएस, आयपीएस, आयएफएसच्या धर्तीवर राष्ट्रीय न्यायिक सेवा सुरू करण्याचा विचार आहे. या विषयावर काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात रविशंकर प्रसाद सामोरे गेले. ते म्हणाले की, दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढले पाहिजेत, असे केंद्र सरकारचे मत आहे.अशा प्रकरणांमध्ये एखाद्या कैद्याने त्याला सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेपैकी निम्मी शिक्षा आधीच भोगली असेल, तर त्याची मुक्तता करण्यात यावी. अशा प्रकरणात ज्या महिला कैद्यांनी पावपट शिक्षा भोगली आहे त्यांचीही सुटका झाली पाहिजे.कायदा ग्रीडची स्थापनारविशंकर प्रसाद म्हणाले की, राष्ट्रीय कायदा ग्रीड बनविण्यात आले असून, त्यात १० कोटी निकाल, तसेच १२ कोटी प्रलंबित खटल्यांची माहिती देण्यात आली आहे. एका क्लिकवर ती माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. कालबाह्य व अनावश्यक कायदे रद्दबातल करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे. त्यानुसार दीड हजार जुने कायदे रद्द केले गेले.