शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सखोल अंतराळ संशोधनासाठी सज्ज व्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:23 IST

Narendra Modi News: भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधन मोहिमेची तयारी करावी, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त केले.

नवी दिल्ली - भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळवणाऱ्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधन मोहिमेची तयारी करावी, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त केले.

व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘आपण चंद्र आणि मंगळ गाठले आहे. आता अंतराळातील गूढ रहस्यांकडे पाहायचे आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी अनेक रहस्ये लपलेली आहेत. भविष्यातील मोहिमांसाठी भारत स्वतःची अंतराळवीरांची फळी उभारणार आहे आणि युवांना त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.’’

‘अंतराळ क्षेत्रात कोणतीही अंतिम सीमा नसावी’ ‘आपल्या क्षितिजांच्या पलीकडे आकाशगंगेच्या पलीकडे आहे, अंतहीन विश्व आपल्याला सांगते की कोणतीही सीमा अंतिम सीमा नाही आणि अंतराळ क्षेत्रातही, धोरणात्मक पातळीवर, कोणतीही अंतिम सीमा नसावी,’ असे पंतप्रधानांनी देशभरातील अवकाश शास्त्रज्ञ, विद्यार्थी व धोरणकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. भारत अवकाश तंत्रज्ञानाकडे केवळ वैज्ञानिक शोधाचे साधन म्हणून पाहत नाही तर जीवनमान सुलभ करण्यासाठीदेखील एक साधन म्हणून पाहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत स्पेस स्टेशन उभारणारपंतप्रधानांनी सांगितले की, भारत विद्युत प्रेरण (इलेक्ट्रिक प्रोपल्शन) आणि अर्ध-क्रायोजेनिक इंजिन यांसारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. ‘लवकरच गगनयान मोहीम राबवली जाईल आणि भारत स्वतःचे स्पेस स्टेशन उभारेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी यांनी खासगी क्षेत्रालाही पुढे येण्याचे आवाहन करत विचारले, ‘ स्टार्टअप्स पुढील पाच वर्षांत युनिकॉर्न बनू शकतील का? आपण दरवर्षी ५० रॉकेट्स प्रक्षेपित करण्याच्या पातळीवर पोहोचू शकतो का?’त्यांनी नमूद केले की अवकाश तंत्रज्ञान केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते मर्यादित नाही. मोदी यांनी तीन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर तिरंगा फडकावणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भेट घेतल्याचे सांगितले आणि त्यांच्या धैर्य व नव्या भारताच्या युवकांच्या असीम स्वप्नांचे कौतुक केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीscienceविज्ञान