शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा परदेश दौऱ्यावर जाल तेव्हा 'दुसऱ्या' मोदीला आणा- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 09:28 IST

राहुल यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांची तुलनाही केली.

मेघालय: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा परदेश दौऱ्यांवर जात असतात. यावेळी परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी येताना जनतेचा पैसा लुटून परदेशात पळालेल्या 'दुसऱ्या' मोदीला (नीरव) परत घेऊन यावे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला. राहुल गांधी मंगळवारी मेघालय येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल यांनी पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यावरून मोदींना चिमटे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याचदा परदेश दौऱ्यांवर जात असतात. त्यामुळे मी देशातील जनेतच्यावतीने त्यांना एक विनंती करतो की, यापुढे जेव्हा परदेश दौऱ्यावर जाल तेव्हा, येताना 'दुसऱ्या' मोदीला परत घेऊन यावे. जेणेकरून देशातील लोकांना त्यांचे कष्टाने कमवलेले पैसे परत मिळतील. यावेळी राहुल यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांची तुलनाही केली. 'नीरव मोदी हिरे विकतो. हिऱ्यांना आपण स्वप्नातील वस्तू म्हणतो. खरे तर त्याने अनेक लोकांची स्वप्ने विकली आहेत. त्यात सरकारही सहभागी आहे. तो जनतेची कमाई लुटून पसार झाला त्यावेळी सरकार शांत झोपले होते. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय जनतेला स्वप्ने विकली होती. त्यात 'अच्छे दिन'चे स्वप्न होते. सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्यांसह अनेक स्वप्नांचा त्यात समावेश होता, असे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याविषयी असमर्थता दर्शविली आहे. सर्व देणी चुकती करण्याची मी ‘आॅफर’ दिली असताना, तुम्ही महाघोटाळ्याची विनाकारण आवई उठवून झटपट वसुलीची कारवाई सुरू केलीत. परिणामी, धंदा बंद झाल्याने माझ्याकडून वसुली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. तुम्हीच तुमच्या कृतीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला, असे त्याने पीएनबीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी