शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:24 IST

केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कलम जवळपास रद्दच केले आहे.

बँक परिक्षा असो की एमपाएससी, एक प्रश्न नेहमी विचारला जातो. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने या प्रश्नाचे उत्तरच बदलले आहे. केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कमल जवळपास रद्दच केले आहे. हे राज्य आता विभागले गेले असून केंद्रशासित प्रदेश झाले आहे. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत. 

1. देशात किती विधान परिषदा आहेत?आधी या प्रश्नाचे उत्तर सात होते. मात्र, जम्मू काश्मीर विभाजनानंतर ही संख्या कमी होऊन सहा झाली आहे. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये विधानपरिषदा आहेत. जम्मू काश्मीर केंद्रशासित झाल्याने तेथे केवळ विधानसभा अस्तत्वात राहणार आहे. अशीच स्थिती दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतही केवळ विधानसभा आहे. जम्मू काश्मीर विधानपरिषदेमध्ये 36 जागा होत्या. यामध्ये 11 पीडीपी, 11 भाजपा, 4 काँग्रेस आणि 4 नॅशमल कॉन्फ्रेन्स असे सदस्य होते. शिवाय 6 जागा रिकाम्या होत्या. 

देशात केंद्रशासित प्रदेश किती?जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर एक राज्य कमी झाले असले तरीही केंद्र शासित प्रदेशांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे.  या आधी देशात सात केंद्र शासित प्रदेश होते. मात्र, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन प्रदेशांची भर पडल्याने ९ झाली आहे. 

केंद्रशासित प्रदेश कोणते?देशाची राजधानी दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली, दीव-दमन, लक्षद्वीप, पुदूच्चेरी असे आधीचे सात आणि आता वाढलेले जम्मू काश्मीर, लडाख असे दोन मिळून नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. 

भारतात राज्यांची संख्या किती?भारतात राज्यांची संख्या पुन्हा एकदा 28 झाली आहे. जम्मू काश्मीर आता राज्य राहिलेले नाही. आधी देशात 29 राज्ये होती. त्यापूर्वी याची संख्या 28 होती. मात्र, आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगानाचा जन्म झाल्याने ही संख्या वाढली होती. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरexamपरीक्षा