शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

फुलाला दिलं "मोदी" नाव, इस्त्रायलने केला पंतप्रधानांचा सन्मान

By admin | Updated: July 4, 2017 22:10 IST

इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी

ऑनलाइन लोकमत
जेरुसलेम, दि. 4 - इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मोदी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. "आप का स्वागत हैं मेरे दोस्त," अशा आश्‍वासक शब्दांत नेतान्याहू यांनी मोदी यांचे स्वागत केले; यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली.
 
स्वागत कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतान्याहू डॅंजिगर फ्लॉवर फार्म येथे पोहोचले. इस्त्रायली सरकारने कृषी क्षेत्रात वापरात असलेल्या उच्च तंत्रज्ञानाचं यावेळी प्रदर्शन केलं. यावेळी भारतीय पंतप्रधानांच्या सन्मानार्थ इस्त्रायली क्रायसेंथेमन या फुलाला "मोदी" हे नाव देण्यात आलं.  फुलांच्या शेतीसाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाविषयी मोदींना माहिती देण्यात आली. 
 
नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत इस्रायलमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांची योग्य प्रकारे सुरक्षा आणि इतर व्यवस्था योग्यप्रकारे होण्याची काळजी तेथे घेतली जात आहे. इस्रायलच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून नावाजले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायली अधिकाऱ्यांसाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अधिक त्रासदायक ठरणारी आहे. पण ट्रम्प यांच्यांभेटीच्या तुलनेत मोदी यांच्या भेटीबाबत बंधने कमी आहेत.मोदी यांच्या भेटीसाठी किंग डेव्हीड हॉटेलचे पार्किंग आणि वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे. या हॉटेलचे अध्यक्ष मालकल फेडरमन देखिल मोदींची भेट घेणार आहेत. फेडरमन हे संरक्षण इलेक्ट्रीक कंपनी एल्बिट सिस्टमचे अध्यक्ष आहेत. ही  या कंपनीचेही भारताशी व्यापारी संबंध आहेत.
 भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.
 
 भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.
 
भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध-
 
1992 - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
 
1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
 
2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
 
2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
 
2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
 
2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
 
2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
 
2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
 
2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
 
2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
 
2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
 
2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.
 
2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.