शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गावस्करांनी बीसीसीआयकडून मागितले १.९० कोटींचे मानधन

By admin | Updated: April 27, 2015 18:50 IST

गेल्या वर्षी युएई व भारतात झालेल्या आयपीएलच्या सातव्या पर्वादरम्यान बीसीसीआय-आयपीएलचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडून १.९० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - गेल्या वर्षी युएई व भारतात झालेल्या आयपीएलच्या सातव्या पर्वादरम्यान बीसीसीआय-आयपीएलचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडून १.९० कोटी रुपयांची मागणी केली आहे.  गावस्कर यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले होते. या काळात त्यांना त्यांच्या मीडिया कमिटमेंट्स ( समालोचन व लिखाण) पाळता येणार नसल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसायने त्यांना योग्य मानधन द्यावे असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.  
त्याच पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी बीसीसआय बोर्डाला पत्र लिहून १ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. ' बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवताना आपण टीव्हीवरील समालोचन, लिखाण आणि माध्यम पंडीत म्हणून काम करू शकलो नाही. त्यामुळे या कामाच्या माध्यमातून मिळणा-या पैशांपासून आपण वंचित राहिलो असून माझे झालेले नुकसान आपण मानधनाच्या स्वरूपात भरून काढण्यासाठी मला १ कोटी ९० लाख रुपये द्यावे,' असे गावस्कर यांनी  पत्रात नमूद केल्याचे त्या अधिका-याने सांगितले. 
 दरम्यान गावस्करांची ही मागणी अद्याप मंजूर करण्यात आली नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आम्हाला त्यांना मानधन द्यावे लागणार आहे, असे तो अधिकारी म्हणाला. फायनान्स कमिटीसमोर हे पत्र ठेवण्यात येणार असून त्यांच्याद्वारेच गावस्कर यांना देण्यात येणारी रक्कम मंजूर करण्यात येईल. मात्र ती रक्कम गावस्कर यांनी मागितलेल्या रक्कमेइतकीच असेल की त्यापेक्षा कमी हे कमिटीच्या शिफारशीनंतरच ठरेल, असेही त्या अधिका-याने सांगितले.