शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गावपातळीपासून करणार पक्षबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:12 IST

देशभरात भाजपा सरकारविरोधात जनमत तयार होत असून जनतेचा केंद्र सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे. सत्तेवर येण्यासाठी भाजपाने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत

नवी दिल्ली : देशभरात भाजपा सरकारविरोधात जनमत तयार होत असून जनतेचा केंद्र सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे. सत्तेवर येण्यासाठी भाजपाने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. परिणामी गुजरात विधानसभेसह नंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची पीछेहाट सुरू झाली आहे. काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच मी व काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अगदी गावपातळीपासूनच पक्षबांधणीचे काम वेगाने सुरू केले आहे. मीही लवकरच देशभर दौरा करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिली.लोकमत मीडियाचे चेअरमन व माजी खा. विजय दर्डा तसेच लोकमत संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी खा. राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी महाराष्टÑातील व देशातील राजकारणाविषयी विस्ताराने चर्चा झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यात अनेक विषयांना खा. गांधी यांनी स्पर्श केला आणि आपली मते मनमोकळेपणाने मांडली.मला लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी चर्चा करायला आवडते. पण इच्छा असूनही सुरक्षारक्षकांच्या बंधनांमुळे ते मला करता येत नाही, याचे सतत वाईट वाटत राहते. पण मी सोशल मीडियाद्वारे सतत त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही लोकांमध्ये मिसळून, सोशल मीडियाद्वारे जनतेशी सतत संपर्क ठेवायला हवा असा माझा आग्रह असतो आणि अनेकांनी त्या दृष्टीने कामही सुरू केले आहे, असे खा. गांधी या वेळी म्हणाले. या वेळी राहुल गांधी यांच्याशी शेतकºयांचे प्रश्न, छोटे व्यापारी, जीएसटीनंतर व्यापाºयांतील अस्वस्थता, कारखानदार व कामगारांच्या समस्या, बेरोजगारी तसेच माध्यमांसमोरची आव्हाने आदी विषयांवर या वेळी चर्चा झाल्याचे खा. विजय दर्डा यांनी सांगितले. या भेटीत खा. राहुल गांधी अधिक आक्रमक व पक्षवाढीसाठी झपाटलेले दिसले. त्यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास जाणवत होता, असेही दर्डा म्हणाले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRahul Gandhiराहुल गांधी