शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘अदानी’ला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व, शरद पवार यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:57 IST

जेपीसीची गरज नसल्याचे व्यक्त केले मत

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी उद्योगसमूहाबद्दल जो अहवाल प्रसिद्ध केला, तशा अर्थाची वक्तव्ये काही व्यक्तींनी याआधीही केली होती. त्यावेळीही संसदेत गदारोळ झाला होता; पण संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी प्रकरणाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अदानी प्रकरणाच्या चौकशीबाबत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

‘जेपीसी’साठी विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ माजविला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या या मागणीशी आपण सहमत नाही.

पवारांचे मुद्दे असे...

  • अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमताना किती दिवसांत अहवाल सादर करावा, याची मुदतही सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली आहे. 
  • जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल, तर सत्य कसे बाहेर येईल हाही चिंतेचा विषय होता. 
  • अदानी व अंबानी उद्योगसमूहांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या प्रकारे लक्ष्य करत आहेत, ते आपल्याला मान्य नाही. 
  • गतकाळात लोक टाटा-बिर्ला या उद्योगसमूहांनादेखील लक्ष्य करत होते.

१९ विरोधी पक्षांना दिसले आरोपांत तथ्य : काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे मत असू शकते. पण अदानी उद्योग समूहावर झालेले आरोप गंभीर असून, त्यात तथ्य आहे, असे २० समविचारी विरोधी पक्षांपैकी १९ पक्षांचे मत होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयराम रमेश यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यांवर व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेस