शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्येचा संशय सनातनवरच, पाच जणांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:48 IST

गौली लंकेश हत्या प्रकरणात धागेदोरे हाती लागल्याचा दावा कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वीच केला होता.

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात संशयाची सुई पुन्हा एकदा सनातनच्या व्यक्तींकडे वळली आहे. प्रवीण लिमकर, (३४, कोल्हापूर), जयप्रकाश उर्फ अण्णा, (४५, मंगलौर), सारंग अकोलकर (३८, पुणे), रुद्र पाटील (३७, सांगली) आणि विनय पवार, (३२, सातारा) अशी या पाच संशयितांची नावे आहेत.गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. विशेष म्हणजे यातील चार संशयितांविरुद्ध २००९च्या मडगाव स्फोट प्रकरणात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. यातील रुद्र पाटील, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचे नाव नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून समोर आलेले आहे. दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी झाली होती. त्याआधी १९ आॅक्टोबर २००९ रोजी गोव्यात मडगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने या चार जणांचे नाव या प्रकरणाशी जोडलेले आहे.सूत्रांनी सांगितले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात तपास संस्थांचा या पाच जणांवर संशय आहे. सनातन संस्थेच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी असा दावा केला होता की, या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने आरोपी म्हणून सादर केले जाऊ शकते, म्हणून ते फरार आहेत. कलबुर्गी, पानसरे यांची हत्या एकाच पद्धतीच्या बंदुकीने झाली असल्याचे यापूर्वीच तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कर्नाटक एसआयटीने असा दावा केला आहे की, तपासात चांगली प्रगती आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, गौरी लंकेश प्रकरणात विशेष तपास पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.गौरी लंकेश यांना जागतिक पातळीवरील अ‍ॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार दिला जातो. अ‍ॅना पोलित्स्काया या रशियन पत्रकार होत्या. रशियातील भ्रष्टाचार, गैरकारभाराचे त्यांनी पत्रकारितेद्वारे वाभाडे काढले होते.त्यांची वयाच्या ४८व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्कारासाठी प्रथमच भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. अ‍ॅना पोलित्स्काया यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांचीहीगोळ्या झाडून हत्या झाली. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेश