शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या प्रकरण: हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 10:35 IST

सीसीटीव्ही फूटेजमधील बाईस्कवाराची शरीरयष्टी नवीन कुमारशी मिळतीजुळती असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

बंगळुरू: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून शुक्रवारी के.टी.नवीन कुमार याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी नवीन कुमारला 18 फेब्रुवारी रोजी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बेंगळुरूतील मॅजेस्टीक भागातील परिवहन महामंडळाच्या बस स्टॅण्डजवळून ताब्यात घेतले होते. त्यावेळी नवीन कुमारकडून एक ३२ कॅलिबर बंदूक आणि १५ जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा उलगडा होण्याच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कुमार हा मांड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे राहणारा आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पाच महिन्यानंतर विशेष पथकाला यश मिळाले. विशेष तपास पथकाने नवीन कुमार याच्या मित्रांनी दिलेल्या जबाबाकडे लक्ष वेध मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून कुमारच्या अटकेची मागणी केली होती. नवीन कुमारच्या मित्रांनी आपल्या जबाबात गौरी लंकेश यांच्या हत्येत नवीन कुमारचा सहभाग असल्याचे सांगितले होते. त्याआधारे पोलिसांनी नवीन कुमारला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर नवीन कुमारला सादर केले तेव्हा एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचा नवीन कुमारच्या जबाबाची प्रतही दिली. याआधारे सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत नवीन कुमारला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पोलीस चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार नवीन कुमार याचे हिंदू युवा सेना, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंध होते. गौरी लंकेश यांच्या हत्येआधी त्यांच्या घराबाहेर बाईकस्वार घराचे निरीक्षण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसआयटीला सध्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा करत आहे. सीसीटीव्ही फूटेजमधील बाईस्कवाराची शरीरयष्टी नवीन कुमारशी मिळतीजुळती असल्याचे पोलिसांचा म्हणणे आहे. त्याशिवाय नवीन कुमार व अन्यजण गौरी लंकेशच्या घराबाहेर असल्याचे अन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशHindutvaहिंदुत्व