शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस पाईपलाईनने उद्योगांना लाभ मिळणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 01:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९०० कोटी रुपये खर्चाच्या गॅस पाइपलाइन योजनेचे उद्घाटन केले.

नवी दिल्ली : बिहारमधील गॅस पाईपलाईन योजनेमुळे राज्यातील लोह, खते आणि वीज उत्पादन या उद्योगांना लाभ मिळणार असून, राज्यातील वाहतुकीसाठी सीएनजीसारखे स्वच्छ इंधन उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गॅस आधारित उद्योगांच्या आगमनामुळे राज्यामध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९०० कोटी रुपये खर्चाच्या गॅस पाइपलाइन योजनेचे उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी वरील प्रतिपादन केले. या योजनेमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाइपलाइन योजना तसेच दोन एलपीजी बॉटलिंग प्लॅँटचा समावेश आहे.या नव्या प्रकल्पामुळे राज्यात पाइपलाइनद्वारे गॅसचे वहन होणार असून, त्याचा लाभ विविध प्रकारच्या उद्योगांना होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल फागू चौहान, मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मंेद्र प्रधान , केंद्रीय दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, डेअरी, पशुपालन मंत्री गिरीराज सिंह आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या इंडियन आॅइल कॉर्पाेरेशन तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन यांनी या दोन योजना तयार केल्या आहेत.योजना पूर्ण होण्याच्या कालावधीत घटबिहारसाठी देण्यात आलेल्या विशेष पॅकेजअंतर्गत येथील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात आला आहे. अडीच वर्षांपूर्वी या योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला मिळाले होते. आज ही योजना पूर्ण होऊन तिचे उद््घाटन मला करता आले, ही समाधानाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. पूर्वी योजना पूर्ण होण्यासाठी एक पिढी पुढे जात असे. आता ही परिस्थिती बदलली आहे, ही अतिशय चांगली बाब असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी