शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातल्या IFFCOच्या प्लांटमध्ये वायू गळती; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

By कुणाल गवाणकर | Updated: December 23, 2020 09:28 IST

१५ कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयांमध्ये उपचार सुरू

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील फुलपूर येथील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (IFFCO) प्लांटमध्ये मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. इफ्फ्कोच्या प्लांटमधील युरिया उत्पादन युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. यामुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर १५ कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वायू गळतीचं प्रमाण मोठं असल्यानं आणखी कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. फुलपूरमधील इफ्फ्कोच्या प्लांटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा अमोनिया वायूची गळती सुरू झाली. युरियाची निर्मिती करणाऱ्या विभागांमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी रात्र पाळीतील कर्मचाऱ्यांचं काम सुरू होतं. साडे अकराच्या सुमारास वायू गळती सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कर्मचारी बाहेरच्या दिशेनं पळू लागले. वायू गळतीमुळे सहाय्यक व्यवस्थापक व्ही. पी. सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन यांचा मृत्यू झाला. तर १५ कर्मचारी बेशुद्ध पडले. वायू गळतीची माहिती मिळताच अधिकारी आणि पोलिसांनी त्यांनी घटनास्थळ गाठलं. बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं. सहाय्यक व्यवस्थापक व्ही. पी. सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन यांची प्रकृती जास्त गंभीर होती. त्यांच्यावर रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. आता वायू गळती रोखण्यात यश आलं असून या संपूर्ण घटनेची चौकशी होणार आहे.