शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचकाने आयुष्यभराच्या कमाईतून उभारला स्वत:चाच पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:14 IST

तामिळनाडूतील आगळी घटना; नाव कमाविण्याचे ध्येय पूर्ण केले

लोकमत न्यूज नेटवर्कसालेम : तामिळनाडूतील एका कचरावेचकाची लहानपणापासून नाव कमाविण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने एक आगळावेगळा मार्ग अवलंबला. आयुष्यभराच्या कमाईतून जमा झालेल्या १० लाख रुपयांतून त्याने जमीन विकत घेतली व तिथे आपला पाच फूट उंचीचा पुतळा उभारला.या कचरावेचकाचे नाव नल्लातंबी (६०) असून तो सालेम जिल्ह्यातील अतनूरपट्टी या गावी राहतो. रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे भंगार वेचून व ते विकून त्याने आयुष्यभर आपला उदरनिर्वाह चालविला.त्याने सांगितले की, नाव कमाविण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती. ती आता विकत घेतलेल्या जमिनीत माझा पुतळा उभारून पूर्ण केली आहे. २० वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहामुळे नल्लातंबी हा आपल्या बायको व मुलांपासून वेगळा राहू लागला. तो पूर्वी कुटुंबासह अनाईमेदू या गावी राहत होता. तिथून नल्लातंबी अतनूरपट्टी या गावी स्थायिक झाला. तिथे आल्यानंतर त्याने प्रथम मोलमजुरी केली. त्यानंतर कचरावेचकाचे काम करूलागला.आता तो रोज या कामातून २५० ते ३०० रुपये कमावतो. आयुष्यभराच्या कमाईतून नल्लातंबी याने नझपाडी-बेलूर रस्त्यालगत १२०० चौ. फूट क्षेत्राचे दोन प्लॉट विकत घेतले. त्यानंतर त्याने आपला पूर्णाकृती पुतळा बनविण्याचे काम एका शिल्पकाराला दिले. त्याचा एक लाख रुपये मोबदलाही दिला. नल्लातंबीने खरेदी केलेल्या जमिनीत तो पुतळा चौथऱ्यावर बसविण्यात आलाआहे.स्वप्नपूर्तीसाठीपैसा ठेवला राखूनकचरावेचक नल्लातंबीबरोबर काम करणाºया मणिकम या मजुराने सांगितले की, त्याला आपला पूर्णाकृती पुतळा स्वत:च्या जमिनीमध्ये उभारायचा होता. त्याचे नाव कमाविण्याचे स्वप्न नल्लातंबीने अशा रीतीने पूर्ण केले. त्यासाठीच त्याने आयुष्यभराची कमाई राखून ठेवली होती. त्यातील एकही पैसा तो कोणाला देत नसे. ध्येय साध्य झाल्याने नल्लातंबी खूप आनंदी आहे.