शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात गोलाणीतील ओटे केले रिकामे

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
चौबे मार्केट ते सुभाष चौक व तेथून कोंबडीबाजार चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार असून तेथील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र गोलाणी मार्केटमध्ये मनपाच्या दप्तरी असलेल्या नोंदी नुसार केवळ ७२ हॉकर्स अधिकृत असताना मोठ्या प्रमाणात ओटे अडवून ठेवलेले असल्याचे आढळून आल्याने गोलाणीतील ओटे अतिक्रमण हटवून रिकामे करण्याची कारवाई या हॉकर्सच्या स्थलांतरापूर्वी करणे आवश्यक होते. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली.
वादावादी व विरोध
मनपा अतिक्रमण विभागाचे पथक तसेच किरकोळ वसुली विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने हे ओटे रिकामे करण्याचे काम सुरू झाले. मात्र काही हॉकर्सनी आम्ही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करीत असून कागदपत्र असल्याचाही दावा केला. मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्यांच्या यादीत नसलेल्या ओटेधारकांचे ओटे रिकामे करून घेतले.
सामान हटविण्यास मुदत
मात्र ओट्यांवरील हॉकर्सची नाराजी नको, म्हणून त्यांचे सामान जप्त न करता त्यांना ते हटविण्यास मुदत देण्यात आली. व्हीडीओ चित्रीकरण करीत ही मोहीम राबविण्यात आली.
हॉकर्सवर अन्याय
मनपा प्रशासनाकडून ओट्यावर अनेक वर्षांपासून व्यवसाय करणार्‍या हॉकर्सवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी हॉकर्सनी केला. कमलबाई श्रावण चौधरी या महिलेने कारवाईसाठी आलेल्या पथकाला मला कोणीच नाही. मी अनेक वर्षांपासून येथेच व्यवसाय करीत असल्याचे सांगूनही सामान हटविण्याची कारवाई करण्यात आली. चौधरी यांनी सांगितले की, त्या आजारी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून घरीच होते. आता बरे वाटल्याने पुन्हा या जागेवर व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. तर अशोक माळी म्हणाले की, फुले मार्केटच्या जागेवर असलेल्या डेली बाजारमधील हॉकर्सला त्या जागेच्या बदल्यात ही गोलाणीतील ओट्यांची जागा कायमस्वरूपी दिली होती. मात्र करार केले नाही. आता मात्र कराराची मुदत संपली आहे, असे सांगितले जात आहे.
सुधाकर वाणी या वृद्ध हॉकरलाही ५६ नंबरच्या ओट्यावरून १०४ नंबरच्या ओट्यावर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी चिडून या पथकासमोर कागदपत्र टाकत जाब विचारला. ८९ सालापासून या ओट्यावर व्यवसाय करीत आहे. तरीही दादागिरी करून ओटा हिसकावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र त्यांचे ऐकून घेताच दिलेल्या ओट्यावर जाण्यास सांगण्यात आले.
ओटे विकणार्‍यांचे काय?
ओटेधारकांपैकी राजेंद्र वाणी, विजय शिंपी, रफिक पिंजारी आदींनी मनपाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. वास्तविक ३हजार रुपयांत कायमस्वरूपी वापरावासाठी हा ओटा दिलेला असताना २००८ मध्ये ओट्यांची मुदत संपल्याचे मनपाकडून सांगितले जात आहे. मग गाळेधारकांप्रमाणे ओटेधारकांना तेव्हाच नोटीस का बजावली नाही? तसेच ज्यांनी ओटे दुसर्‍यांना विकून टाकले. त्यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल केला.