संबलपूर (ओडिशा) : अल्पवयीन मुलीवर (१५) सामुहिक बलात्कार केल्याच्या खटल्यात जलदगती न्यायालयाने ३० दिवसांत पाच जणांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व प्रत्येकाला ५० हजार दंड ठोठावला. यातील सहावा आरोपी हा अल्पवयीन असून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दोन मे रोजी संबलपूर जिल्ह्यात अत्याचाराची घटना घडली होती तिने २३ मे रोजी आत्महत्या केली.पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, सासन (जिल्हा संबलपूर) भागातून माझी मुलगी त्या दिवशी स्थानिक बाजाराला निघाली होती. तेव्हा अल्पवयीन आरोपी मुलगा तिच्याशी संभाषणासाठी आला. त्याने तिला निर्जळ ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून दिले. नंतर ही मुलगी आणखी पाच जणांना दिसली व त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सांगितले. या तक्रारीच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत सहा जणांना अटक करण्यात आली.
सामूहिक बलात्कार, पाच जणांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:20 IST