महेशतला (प़बंगाल) : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या अक्रा येथे एका २४ वर्षीय विवाहितेवर पाच नराधमांनी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला आणि नंतर बेशुद्धावस्थेत धावत्या आॅटोरिक्षातून तिला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे़ तथापि मुख्य आरोपी साफिक अद्यापही फरार आहे़ त्याचे पीडितेसोबत कथितरीत्या संबध होते़. दोन मुलांची आई असलेली पीडिता पतीपासून विभक्त झाली होती आणि अक्रा येथे आपल्या आईसोबत राहात होती़ ३१ जुलैला साफिकने तिला एका आॅटोरिक्षात बसवले़ रिक्षात आधीच त्याचे चार मित्र बसलेले होते़ या सर्वांनी पीडितेला कोल्डड्रिंक पाजले़ ते पिताच पीडिता बेशुद्ध झाली़ यानंतर नराधमांनी बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकून दिले. (वृत्तसंस्था)
धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार
By admin | Updated: August 4, 2014 02:39 IST