शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:27 IST

लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याशिवाय असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी राहुल यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला असला तरी राहुल आपल्या निर्धारावर ठाम आहेत.कॉँग्रेसने निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यामुळे यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी सांगितले. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले.काँग्रेसच्या अपयशामागील कारणांची व राहुल गांधी यांनी सादर केलेला राजीनामा यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यास काही सदस्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव सुचवले. मात्र पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला. त्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी ए. के. अ‍ॅन्टोनी, कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे चर्चेत आली.काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्याबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. या राज्यांमध्ये कॉँग्रेसची सत्ता असतानाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येथील मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका सदस्यांनी केली. त्यामुळे अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल यांचे भवितव्य धोक्यात आहे.बैठकीत कॉँग्रेस अध्यक्षांना संघटनेत बदल करण्याचे सर्वाधिकार बहाल करण्यात आले. त्याचबरोबर येत्या महिन्या-दोन महिन्यांत प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांमध्येही बदल होणार असल्याचे सूतोवाच या वेळी करण्यात आले. याशिवाय पक्षावर कब्जा केलेल्यांनाही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या सोशल मीडियावरील प्रचारापेक्षा कॉँग्रेसचा प्रचार कमी पडत असल्याचे अनेक सदस्यांनी यावेळी सांगितले. कॉँग्रेसने या बाबीकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता अनेक सदस्यांनी बोलून दाखविली. भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने सोशल मीडियावर अधिक सक्रिय होण्यावर अनेकांनी भर दिला.बैठकीमध्ये संसदेत आणि बाहेरही सरकारला कैचीत पकडण्यासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करून धोरण निश्चित करण्याची गरज अनेक सदस्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या मूलभूत रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे सारे अधिकार पक्षाध्यक्षांना कार्यकारिणीने दिले आहेत. लोकसभा निवडणुकांत जनतेने दिलेला कौल काँग्रेसने विनम्रतेने स्वीकारला आहे. काँग्रेसला मत देणाऱ्या मतदारांचे पक्षाने आभार मानले आहेत. यापुढेही काँग्रेस जबाबदार व सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभावत राहील, असेही त्यांनी सांगितले.>लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस