शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या नादात त्यांनी..."; विद्यापीठाने 'रोबो डॉग' वादाचे महिला प्रोफेसरवर फोडले खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 20:15 IST

Galgotias University Apologises:'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे सांगून देशाला पेचात टाकणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने ...

Galgotias University Apologises:'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे सांगून देशाला पेचात टाकणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने अखेर या प्रकरणावर अधिकृत माफीनामा जाहीर केला आहे. "इनोव्हेशनला चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता," असे स्पष्टीकरण देत युनिव्हर्सिटीने या संपूर्ण प्रकाराचे खापर तिथे उपस्थित असलेल्या प्रोफेसरवर फोडले आहे.

नेमकी चूक काय झाली? युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण

गलगोटिया युनिव्हर्सिटीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केले. "पव्हेलियनमध्ये उपस्थित असलेल्या युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधीला उत्पादनाच्या तांत्रिक माहिती नव्हती. कॅमेऱ्यासमोर येण्याच्या उत्साहात त्या प्रतिनिधीने चुकीची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी अधिकृतपणे नियुक्तही करण्यात आले नव्हते. हा प्रकार म्हणजे एक मानवी चूक असून, शैक्षणिक पारदर्शकता जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असंयुनिव्हर्सिटीने सांगितले.

प्रोफेसर नेहा सिंह यांच्यावर ठपका

या वादाचे केंद्र ठरलेल्या प्रोफेसर नेहा सिंह यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ओरियन नावाचा रोबो डॉग दाखवला होता. हा रोबो गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, नेटकऱ्यांनी हा रोबो चीनच्या यूनिट्री रोबोटिक्स कंपनीचा यूनिट्री जीओ२ असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले. यामुळे सोशल मीडियावर युनिव्हर्सिटीवर टीकेचा वर्षाव झाला.

देशाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप; स्टॉल हटवला

भारताच्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय समिटमध्ये चिनी उत्पादनाला स्वदेशी सांगणे ही देशासाठी मोठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे. हा वाद वाढल्यानंतर आयोजकांनी गलगोटिया युनिव्हर्सिटीला तात्काळ स्टॉल खाली करण्याचे निर्देश दिले.

आयोजकांच्या सूचनेनंतर युनिव्हर्सिटीने तिथून आपले सर्व साहित्य हटवले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी युनिव्हर्सिटी प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आश्वासन दिले आहे. यापुढे केवळ अधिकृत अधिकारीच माध्यमांशी संवाद साधतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Galgotias University blames professor for 'robot dog' controversy fallout.

Web Summary : Galgotias University apologized after showcasing a Chinese robot as its own. The university blamed a professor for providing false information to the media, stating it was a human error driven by excitement.
टॅग्स :delhiदिल्लीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स