शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Gaganyaan Missionसाठी10 हजार कोटी रुपये मंजूर, 3 सदस्य अंतराळात 7 दिवस राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 18:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत इस्रोचे 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतीन सदस्यीय क्रू सात दिवस अंतराळात राहणार पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी केली होती मिशन गगनयानची घोषणा 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत इस्रोचे 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मिशन अंतर्गत तीन सदस्य सात दिवसांसाठी अंतराळात वास्तव्य करणार आहेत. 

मंजुरी मिळाल्यानंतर 40 महिन्यांच्या आत ही योजना लाँच करण्यात येईल. आज जगभरातील अन्य देश उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी इस्त्रोची मदत घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच 'मिशन गगनयान'ची घोषणा केली होती. हे मिशन 2022 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मदतीसाठी भारतानं रशिया आणि फ्रान्ससोबत करार केला आहे. 

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ‘गगनयान’ची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 2022 मध्ये वा त्याआधीच भारतातून, भारतीय यानातून भारताचा पहिला सुपुत्र वा सुकन्या अंतराळात झेपावेल आणि तेथे तिरंगा फडकवेल.

पंतप्रधानांच्या या योजनेचा तपशील अणुऊर्जा व अंतराळ संशोधन खात्यांचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी जाहीर केला. मोहीम यशस्वी झाल्यास मानवासह अंतराळयान सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतर चौथा देश ठरेल.ते म्हणाले की, अंतिम टप्प्यात तीन अंतराळवीरांना घेऊन यान अवकाशात झेपावेल. हे यान पृथ्वीपासून 300 ते 400 किमी अंतराच्या कक्षेत सात दिवस प्रदक्षिणा घालेल. या काळात अंतराळवीर कमी गुरुत्वाकर्षणात वावरण्याचा, कामे करण्याचा सराव व प्रयोग करतील. प्रत्यक्ष अंतराळवीर पाठवण्याआधी दोनदा मानवरहित याने पाठवून सर्व यंत्रणांची कसोशीने चाचणी घेतली जाईल.

 

सिवान यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी अवजड वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ‘जीएसएलव्ही-मार्क 3’ हा सिद्धहस्त अग्निबाण वापरला जाईल. यानात जेथे अंतराळवीर बसतील तो कक्ष (क्रू मॉड्युल) सात मीटर उंचीचा व सात टन वजनाचा असेल. सात दिवसांच्या सफरीनंतर यान अंतराळवीरांसह गुजरात किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सुखरूपपणे उतरविले जाईल.

‘इस्रो’खेरीज विविध विद्यापीठे, खासगी उद्योग तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांचा सक्रिय सहभाग असल्याने ‘गगनयान’ राष्ट्रीय अभिमानाची मोहीम असेल, असे सिंग म्हणाले. योजनेस विलंब होऊ नये व उणीव राहू नये यासाठी मित्रदेशांची मदत, सहकार्य घेण्याचाही ‘इस्रो’चा विचार आहे, असे सिवान म्हणाले.

गगनयानच्या पूर्वतयारीचाच भाग म्हणून ‘इस्रो’ने गेल्या महिन्यात श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळतळावर ‘पॅड अ‍ॅबॉर्ट’ नावाची यशस्वी चाचणी केली. अपरिहार्य परिस्थितीत यान सोडून देण्याची वा नष्ट करण्याची वेळ आल्यास, अंतराळवीरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासंबंधी ही चाचणी होती.

अंतराळवीर कोण असतील?भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी याआधी अमेरिका व रशियाच्या यानातून अवकाशात भरारी घेतली असली तरी भारतीय यानातून जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होण्याचा मान कोणाला मिळेल, हे स्पष्ट व्हायला प्रतीक्षा करावी लागेल.कुशल व अनुभवी वैमानिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यांची निवड करून अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण देण्याचे काम ‘इस्रो’ व हवाई दल संयुक्तपणे करतील.

टॅग्स :isroइस्रो