शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी जोमाने काम करणार,सिंचनव्यवस्था सुधारण्यास अग्रक्रम : गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:18 IST

सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊस पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊ स पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते. जलसंधारणाद्वारे आणखी १५ ते २0 टक्के पाणी वाचविले जाते. बाकी ७0 टक्के पाणी समुद्रात जाते. ही बाब लक्षात घेऊ न, ज्या राज्यांमध्ये सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही, तेथील अर्धवट योजना कार्यान्वित करण्यासाठी वेळापत्रकानुसार धडक कार्यक्रम राबविण्याचा इरादा नितीन गडकरी यांनी सोमवारी बोलून दाखविला.केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारताना गडकरी बोलत होते. या विभागाच्या मावळत्या मंत्री उमा भारती, विद्यमान राज्यमंत्री सत्यपालसिंग व अर्जुन मेघवाल या वेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कोरडवाहू शेतीच्या वेदना विदर्भातील शेतकºयांनी वर्षानुवर्षे झेलल्या आहेत. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्याही दुर्दैवाने याच भागात झाल्या आहेत. महाराष्ट्रात सिंचन व्यवस्थेचे प्रमाण ५0 टक्के असते, तर एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नसती. गेली पंधरा वर्षे जलसंधारणाच्या नेटाने पाठपुरावा करण्यात मी घालविले. मंत्री नसतो, तर बहुदा याच कामासाठी आयुष्य घालविले असते. प्रगत तंत्रज्ञानाने पाणी अडविण्याचे, जिरविण्याचे अनेक प्रयोग राबविता येतात. नदी-नाल्यांच्या रुंदीकरणासह ठिकठिकाणी बॅरेजेस बांधता येतात. वाजपेयींच्या काळात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जलसंसाधन मंत्रालयात बरेच काही करण्यासारखे आहे.राजकीय इच्छाशक्ती असेल, तर सिंचनासह भारताच्या विविध क्षेत्रांत लक्षवेधी बदल घडविता येतील. कामातील अडथळे दूर करून नेटाने ते पूर्णत्वाला नेण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. नमामी गंगे या गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी त्याच इच्छाशक्तीने काम करण्याची माझी तयारी आहे, असे गडकरी म्हणाले.उमा भारतींनी केले कौतुक-उमा भारती म्हणाल्या की, गडकरी पक्षाध्यक्ष असताना भाजपामध्ये माझा पुनर्प्रवेश झाला. गंगा शुद्धिकरण मोहिमेच्या सेलचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपविले. तेव्हापासून या मोहिमेशी मी संलग्न आहे. या विभागाचे मंत्री माझ्याकडे असताना निर्णय घेण्यात गडकरींनी मला मदत केली.त्यामुळेच त्यांच्या योग्य हाती या विभागाचा कार्यभार सोपविताना मला आनंद होत आहे. नमामी गंगे प्रकल्पाची पहिली आहुती मी टाकली आहे. नियोजित वेळेत त्याची पूर्णाहुती नितीन गडकरींच्या हस्ते पडेल, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी