शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी-राहुल यांच्यात कलगीतुरा! ‘धाडसा’च्या अनाहूत कौतुकावरून टि्वटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 08:55 IST

‘भाजपामध्ये नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून उपरोधिक कौतुक करण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.

नवी दिल्ली : ‘भाजपामध्ये नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून उपरोधिक कौतुक करण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.‘जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार?, असे विधान गडकरी यांनी शनिवारी रात्री नागपूरमध्ये अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले. त्यावरून राहुल गांधी व गडकरी यांनी परस्परांवर टिष्ट्वटकार केले. हे करत असतानाच गडकरी यांनी माध्यमांनी आपले वक्तव्य विकृत स्वरूपात प्रसिद्ध केल्याचेही ध्वनित केले.गडकरी यांनी हे कथित विधान पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केल्याचे गृहित धरून राहुल गांधी यांनी केलेल्या टिष्ट्वटने याची सुरुवात झाली. त्यात राहुल गांधी यांनी लिहिले, ‘ गडकरीजी, अभिनंदन! भाजपामध्ये थोडे बहुत धाडस असलेले तुम्ही एकटेच आहात. जरा या विषयांवरही बोला. १. राफेल घोटाळा व अनिल अंबानी, २. शेतकऱ्यांची हालाखी, ३. लोकशाही संस्थांचे खच्चीखरण.’याला उत्तर देताना गडकरी यांनी लिहिले, ‘राहुल गांधीजी माझ्या धाडसाबद्दल मला तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही. पण एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही आमच्या पक्षावर हल्ला चढविण्यासाठी तुम्हाला माध्यमांनी दिलेल्या विकृत वृत्तावर अवलंबून राहावे लागावे, याचे आश्चर्य वाटते.’पुढच्या टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी यांना उद्देशून गडकरी यांनी लिहिले, ‘ मी काही विषयांवर बोलावे असे तुम्ही सुचविले आहे. त्यापैकी राफेलविषयी मी असे सांगेन की, देशाच्या हिताला अग्रक्रम देऊनच आमच्या सरकारने हा करार केला. तुमच्या सरकारच्या धोरणांनी शेतकºयांना संकटात टाकले, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम मोदीजी करत आहेत.’ मोदींच्या प्रामाणिकपणाने विरोधक हताश झाले आहेत, असा टोला लगावत गडकरी यांनी भविष्यात राहुल गांधी अधिक तर्क संगत व जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. गडकरी यांच्या उत्तरानंतरही राहुल गांधी गप्प बसले नाहीत. सकाळच्या आपल्या पहिल्या टिष्ट्वटमध्ये बेरोजगारीचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण