शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 09:29 IST

G7 summit : तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

नवी दिल्ली : जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीइटलीला रवाना झाले आहेत. उच्चस्तरीय शिष्टमंडळासह १४ जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेच्या संपर्क सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इटलीला रवाना झाले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. दरम्यान, १३ ते १५ जून या कालावधीत इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्ष हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे संवाद आणि मुत्सद्दीपणा असल्याचा पुनरुच्चार भारताने बुधवारी केला. युक्रेन संघर्षाबाबत विचारले असता परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, "आमचे नेहमीच असे म्हणणे आहे की, हा संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दीपणा हा सर्वोत्तम पर्याय आहे." दरम्यान, विनय क्वात्रा यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आज युद्धाचे युग नाही' या विधानाची आठवण करून दिली. तसेच, विनय क्वात्रा यांनी युद्धाच्या परिणामांबद्दल सांगितले, ज्यात अन्न, इंधन आणि खतांच्या उपलब्धतेवर परिणाम, जागतिक पुरवठा साखळीतील आव्हाने आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील व्यत्यय यांचा समावेश आहे.

१४ जूनला पंतप्रधान मोदी संपर्क सत्रात सहभागी होणारपंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी इतर देशांशी संपर्क सत्रात सहभागी होतील. हे सत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय विषयांवर लक्ष केंद्रित असणार असल्याचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले. तसेच, जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहभागामुळे गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या परिणामांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. जी-७ शिखर परिषदेत भारताचा नियमित सहभाग जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नवी दिल्लीच्या प्रयत्नांची वाढती ओळख दर्शवतो, असेही विनय क्वात्रा यांनी सांगितले.

जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकपंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, असे विनय क्वात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, "बैठकीत, दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेणे आणि पुढील टप्प्यांसाठी दिशा देणे अपेक्षित आहे." याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत का? असे विचारले असता विनय क्वात्रा यांनी थेट उत्तर दिले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेळापत्रक अद्याप ठरविले जात असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीItalyइटली